गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तापी-गोमाई काठ झाला सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:36 IST2019-09-11T11:36:50+5:302019-09-11T11:36:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा/नंदुरबार : जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गणेश मंडळांकडून प्रकाशा ता़ शहादा येथील तापी व गोमाई नदी पात्रात ...

गणेशभक्तांच्या सुरक्षिततेसाठी तापी-गोमाई काठ झाला सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा/नंदुरबार : जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गणेश मंडळांकडून प्रकाशा ता़ शहादा येथील तापी व गोमाई नदी पात्रात गणेश मूर्तीचे विसजर्न करण्यात येत़े यामुळे याठिकाणी होणा:या गर्दीतून अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आह़े यांतर्गत तापी आणि गोमाई काठावर सक्षम सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आह़े
जिल्ह्यात यंदा 240 खाजगी तर 549 सार्वजनिक मंडळांनी आणि 98 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रमांतर्गत मूर्तीची स्थापना करण्यात आली होती़ या मूर्तीचे एकूण 9 टप्प्यात विसजर्न केले जाणार होत़े यात दिड दिवसांचे 11, तिस:या दिवशी 11, पाचव्या दिवशी 162 सार्वजनिक व 68 खाजगी, सहाव्या दिवशी 60 सार्वजनिक व 10 खाजगी गणपतींचे विसजर्न करण्यात आले आह़े सातव्या दिवशी सार्वजनिक, एक गाव एक गणपती आणि खाजगी अशी एकूण 210 मंडळे, आठव्या दिवशी चार सार्वजनिक तर नवव्या दिवशी 52 गणेश मंडळांकडून विसजर्न करण्यात आले आह़े
बुधवारी 11 सार्वजनिक मंडळांकडून गणेश मूर्तीचे विसजर्न होणार आह़े तसेच अनंत चतुदर्शीच्या दिवशी 139 सार्वजनिक व 40 खाजगी गणेश मंडळांतर्फे विसजर्न करण्यात येणार आह़े मिरवणूकांनंतर या मूर्ती विसजर्नासाठी प्रकाशा येथील तापी-गोमाई संगमाकडे रवाना होणार आहेत़ यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत़
विसजर्न मिरवणूकांच्या पाश्र्वभूमीवर प्रकाशा ग्रामपंचायतीने नदी घाटाच्या रस्त्यांवर पथदिवे आणि हायमस्टची व्यवस्था करण्यात आली आह़े आपत्ती व्यवस्थापनासाठी नियुक्त पथकातील सदस्य यांत्रिकी आणि रबरी बोटीसह बॅरेज व पुलाखाली सज्ज राहणार आहेत़ गणेश मंडळांच्या सोयीसाठी नदीपात्रात यांत्रिकी बोटीतून गणेश मूर्तीचे विसजर्न करण्याची संधी देण्यात येणार आह़े आपत्ती व्यवस्थापन विभागाने विविध सुरक्षा प्रणाली असलेले साहित्य येथे दिल्याने पाण्यातील सुरक्षेचा प्रश्न मिटला आह़े शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रकाशा येथील पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम बोराळे यांच्यासह पोलीस वंतू गावीत, शोएब शेख, पंकज जिरेमाळी यांच्यासह होमगार्ड येथे नियुक्त केले गेले आहेत़
प्रकाशा येथे गणेश विसर्जनासाठी जिल्हाभरातून भाविक येण्याची शक्यता असल्याने पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन दल आणि प्रकाशा येथील पट्टीचे पोहणारे यांची नियुक्ती करण्यात आली आह़े शहादा शहर आणि तालुक्यातून येणा:या गणेश मूर्तीचे गौतमेश्वर मंदिर परिसरातील गोमाई नदीत विसजर्न केले जाणार आह़े काही मंडळांकडून संगमेश्वर महादेव मंदिरावराच्या घाटावरही विसजर्न करण्यात येणार आह़े नंदुरबार, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा येथून येणा:या मूर्ती ह्या केदारेश्वर मंदिराच्या घाटावरुन विसजिर्त करण्यात येणार आहेत़ ठिकाणी सर्वत्र मुबलक पाणी असल्याने विसर्जनासाठी तया:या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ प्रकाशा येथील तापी नदी दुथडी भरुन वाहत आह़े गोमाई नदीही दुथडी भरुन वाहत असल्याने सर्तकता बाळगली जात आह़े केदारेश्वर, संगमेश्वर आणि गौतमेश्वर मंदिरावर पोलीस कर्मचारी नियुक्त करुन बॅरिकेटींग करण्यात आली आह़े आपत्ती व्यवस्थापन पथकातील सीताराम ङिांगाबाई व इतर सदस्य यांत्रिकी बोटीवर विसजर्न पूर्ण होईर्पयत पाण्यात गस्त करणार आहेत़
प्रकाशा ग्रामपंचायतील गोमाई नदी पुलावर होणारी गर्दी लक्षात घेत हायमस्ट दिवे आणि जादाचे प्रखर क्षमतेचे दिवे लावले आहेत़ यामुळे पुलावर उजेड कायम राहणार आह़े प्रकाशा बॅरेज प्रकल्पाचे अभियंता वरुण जाधव यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, बॅरेजचे पाणी 109 मीटरवर थांबले आह़े बॅरेजचे तीन दरवाजे दोन मीटरने उघडले आहेत़ त्यातून पाण्याचा विसर्ग होत आह़े प्रकाशातील घाटांसोबतच कोरीट गावाजवळील काठावरुन नंदुरबार शहर व तालुका परिसरासह आणि गुजरात राज्यातील गणेशमूर्तींचे विसजर्न करण्यात येत़े त्याठिकाणी सुविधा नसतानाही भाविक जीव धोक्यात घालून रात्री पाण्यात उतरत असल्याने यंदा पोलीसांचे पथक लक्ष ठेवून असणार आह़े नंदुरबार तालुक्यातील इतर तापी नदी काठावरील गावांमध्ये सुरळीतपणे गणेश विसजर्न व्हावे यासाठी त्या-त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सुचना करण्यात आल्या आहेत़