शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

‘तापी-बुराई’ला अडथळ्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:36 AM

20 वर्षात पहिला टप्पाही पूर्ण नाही : वनजमीन, खाजगी जमीन आणि वीज बिलांचा प्रश्न

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तापी पाटबंधारे विकास महामंडळाने फेब्रुवारी 1999 मध्ये मंजूर केलेली तापी-बुराई उपसा योजना अडचणींच्या डोंगरात उभी आहे. साठवण तलावांसाठी वन जमीनी मिळविण्याचा प्रश्न, निधीची अपुरी तरतूद, पंपगृहांसाठी लागणारी विजेची तरतूद आदी समस्या कायम राहणार आहे. त्यामुळे ही योजना एक मृगजळच ठरते की काय अशी अवस्था आहे. 20 वर्षात पहिला टप्पाही पुर्ण होऊ शकला नाही. यावरूनच या योजनेचे भवितव्य स्पष्ट होते.नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील अवर्षण प्रवण गावांसाठी जिवनदायी ठरणारी तापी-बुराई योजनेस तापी पाटबंधारे विकास महामंडळाने 2 फेब्रुवारी 1999 ला मान्यता दिली होती. नदीजोड प्रकल्प म्हणूनही देखील या योजनेकडे पाहिले जाते. तीन तालुक्यांना लाभदायीही योजना तीन तालुक्यांना लाभदायी ठरणार आहे. नव्या आराखडय़ानुसार बलदाणेचे अमरावतीनाला धरण भरण्यात आल्यास (66 दशलक्ष घनमीटर पाणी) पूर्वेकडील नेहमीच अवर्षण  प्रवण असलेल्या गावांना त्याचा लाभ होणार आहे. शनिमांडळ लघु पाटबंधारे प्रकल्पातून अमरावती नदीद्वारे पाणी नेवून मालपूर, ता.शिंदखेडा येथील अमरावती मध्यम प्रकल्पात (10 दशलक्ष घनमीट पाणी)पाणी साठवले जाणार आहे. त्यामुळे शनिमांडळ ते वैंदाणे-मालपूर या दरम्यान ही नदी बारमाही प्रवाहीत राहील. शनिमांडळ प्रकल्पातून पुढे बुराई प्रकल्पात अर्थात वाडी-शेवाडी (सहा दशलक्ष घनमीटर) पाणी नेले जाणार आहे. तेथून बुराई नदी बारमाहीचा प्रय} आहे. वनजमीनीचा प्रश्नपहिल्या टप्प्यातील निंभेल प्रकल्पासाठी वन जमिनीचा प्रय} करावा लागणार आहे. खाजगी सल्लागारामार्फत वनजमीन संपादनासाठी निवेदेनुसार कार्यवाही सुरू आहे. वनजमीन संपादन करण्यासाठी पर्यायी जमिनीसाठी प्रस्ताव जिल्हाधिका:यांकडे यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. तर खाजगी जमीन मिळविण्यासाठी      90 टक्के खातेदार शेतक:यांचे संमतीपत्र पाटबंधारे विभागाकडे आलेली आहेत. दर निश्चिती होऊन शेतक:यांना मोबदला दिला जाणार आहे.पंपगृहांना लागणार वीजया योजनेअंतर्गत तापीपात्रात हाटमोहिदा, निंबेल, आसाणे व शनिमांडळ येथे पंपगृह उभारावे लागणार आहे. पंपाद्वारे पाणी  पुढे नेण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर विजेची आवश्यकता लागणार                 आहे. राज्य विद्युत मंडळातर्फे 10 मे.व्ॉ.वीज उपलब्ध करून देण्यास सहमती मिळविण्यात आली आहे. विद्युत खर्चासाठी 27 कोटी रुपये प्रस्तावीत करण्यात आले                आहेत. त्यानंतर योजना सुरू  झाल्यावर पंपगृहांसाठी लागणा:या विजेचा बिलाचा प्रश्न उपस्थित होणार आहे.प्रकाशा बॅरेजच्या बुडीत क्षेत्रातून पावसाळ्यात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या डाव्या तिरावरुन इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाव्दारे 41.47 दलघमी पाणी उचलणे प्रस्तावित आहे. जॅकेवल पासून 1600 मी. मी. व्यासाचा एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे पहिला टप्पा द्वारे निभेंल साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 1204 हेक्टर इतकी आहे. दुसरा टप्पा 1550 मी. मी. व्यासाच्या एम. एस. पाईपच्या एकेरी रांगेव्दारे आसाणे साठवण तलावात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 2339 हेक्टर इतकी आहे.तिस:या टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील शनिमांडळ तालवात पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिंचन क्षमता 354 हेक्टर इतकी आहे. चौथ्या  टप्प्यात 1200 मी. मी. व्यासाचा एकेरी रांगेव्दारे अस्तित्वातील बुराई मध्यम प्रकल्पात पाणी  पाणी साठविण्यात येणार आहे. त्याची सिचंन क्षमता 3188 हेक्टर आहे.  निभेंल व आसाणे साठवण तलाव बांधणे प्रस्तावित आहे. निंभेल व आसाणे या नवीन साठवण तलावाची तसेच ल.पा.यो. शनिमांडळ व बुराई मध्यम प्रकल्पाची वाढीव व साठवण क्षमता 7085 हे. असून 3429 हे.सिंचन क्षेत्र नंदुरबार जिल्ह्यांतर्गत नंदुरबार तालुक्यातील आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 1708 हेक्टर व साक्री तालुक्यातील 1948 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.