The tanker overturned near the big kadwan and spilled edible oil | मोठे कडवानजवळ टँकर उलटून खाद्यतेल वाहिले

मोठे कडवानजवळ टँकर उलटून खाद्यतेल वाहिले

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी ते नंदुरबार मार्गावर मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळ खाद्य तेलाचे टँकर पलटी झाल्याने लाखो रुपयांचे  तेल वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. हा अपघात रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडला.
गुजरात राज्यातील हाजिरा येथून जी.जी. १२ एझेड ७५०८ हा टँकर खाद्यतेल घेऊन मध्यप्रदेश राज्यातील इंदूर येथे जात असताना रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मोठे कडवान गावाच्या फाट्याजवळ टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यातून  टँकर रस्त्याच्या बाजूच्या चारी मध्ये उलटले. यावेळी पाऊस सुरू होता. खड्ड्यात  जोरात आदळले गेल्याने टॅंकरचे वरील झाकणे उघडून आतील खाद्यतेल शेजारील शेतात वाहून गेले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. याबाबत महेंद्र हरिसिंग मकवान यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात खबर दिल्याने नोंद आहे.

Web Title: The tanker overturned near the big kadwan and spilled edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.