भरधाव टँकर उलटून सहचालक ठार : चिंचपाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 12:45 IST2018-03-11T12:45:58+5:302018-03-11T12:45:58+5:30
चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव टँकर उलटून सहचालक ठार : चिंचपाडा
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 11 : नाशिकहून सुरतकडे जाणारा टँकर उलटल्याने सहचालक ठार झाल्याची घटना चिंचपाडानजीक शुक्रवारी रात्री घडली. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरुसिंग गंगासिंग राजपूत (55) रा.मोहद्दीनपूर, ता.कुरला, (उत्तरप्रदेश) असे मयत सहचालकाचे नाव आहे. नाशिककडून सुरतकडे महामार्गाने टँकर (क्रमांक जीजे 06-एएक्स 5527) भरधाव जात होते. चिंचपाडानजीक चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या बाजुला उलटला. त्यात सहचालक बेरूसिंग राजपूत हे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चालक राममिलनसिंग सितारामसिंग राजपूत यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार सोनवणे करीत आहे.