राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तालुकानिहाय बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST2021-02-05T08:11:28+5:302021-02-05T08:11:28+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा व तालुकानिहाय तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह कार्यकारिणी नियुक्त करण्यात ...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तालुकानिहाय बैठका
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा व तालुकानिहाय तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह कार्यकारिणी नियुक्त करण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची १ फेब्रुवारीपासून तालुकानिहाय बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी रोजी तळोदा येथे शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता आणि अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ईरा इंटरनॅशनल स्कूल याठिकाणी दुपारी तीन वाजता माजी आमदार शरद गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, डाॅक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.जगदीश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होईल. २ फेब्रुवारीला धडगाव येथे शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता माजी आमदार शरद गावीत, विनायक गावीत तर शहादा येथे शासकीय विश्रामगृहात दुपारी चार वाजता माजी आमदार शरद गावीत व विनायक गावीत यांच्या उपस्थितीत बैठक होईल. ३ फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता माजी आमदार शरद गावीत, जि.प.चे माजी बांधकाम सभापती एम.एस. गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील तर नवापूर येथे शासकीय विश्रामगृहात दुपारी तीन वाजता नगरसेवक इकबाल शेख, राजू पाटील, पदवीधर जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणीसह तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या बैठकीला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निश्चित तारीख, वेळेला बैठकीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी केले आहे.