तालुका आरोग्य अधिकारी हक्काच्या केबीनपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:49 IST2020-03-02T11:49:37+5:302020-03-02T11:49:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद आरोग्य विभागात मानाचे पद असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक ...

तालुका आरोग्य अधिकारी हक्काच्या केबीनपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषद आरोग्य विभागात मानाचे पद असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे़ नियुक्त केलेल्या या अधिकाऱ्यांना त्या-त्या पंचायत समित्यांमध्ये जागा देण्याच्या सूचना असतानाही मात्र कार्यालय दिले जात नसल्याने कामकाज लांबवणीवर पडत आहे़
जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकाºयांच्याबाबतीत हा प्रकार सुरु असून आरोग्य विभागाने पंचायत समित्यांना सूचना करुनही जागा दिली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे़ एकीकडे बसण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मानपानाचे तालुका वैद्यकीय अधिकारी शासकीय वाहनांपासूनही ंवंचित असून त्यांना पंचायत समित्यांची वाहने किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अँम्ब्युलन्समधून दौरे करावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे़ जिल्ह्यात ६० आरोग्य उपकेंद्रांत वर्षभर राबवल्या जाणाºया उपक्रमांना अधिक चालना मिळून त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ यातील तळोदा येथील तालुका वैद्यकीय अधिकाºयांना योग्य ते केबीन नसल्याचे वेळोवेळी समोर आले होते़ तालुका वैद्यकीय अधिकाºयांना पंचायत समितीत जागा देण्याची सूचना आहे़ परंतू सर्वच तालुकास्तरीय कार्यालये ही इतरत्र चालवण्यात येत आहेत़ यात वेळोवेळी आॅफिस बदल करण्याची प्रक्रिया होत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे़ यातून रेकॉर्ड इकडून तिकडे करण्यात बराच वेळ जावून आरोग्या संदर्भातील योजना राबवण्याच्या कामांना खीळ बसत असल्याचे चित्र आहे़ संबधित आरोग्यधिकारी याबाबत सातत्याने प्रशासनासोबत चर्चा करुनही त्यांच्या स्वतंत्र कार्यालयांचा प्रश्न सोडवला गेलेला नाही़ तालुका आरोग्य अधिकाºयांना ग्रामीण रुग्णालय किंवा पंचायत समिती येथे कार्यालय देण्याचे शासनाचे आदेश आहेत़ मात्र आरोग्य विभागाने हे आदेशच पाळलेले नसल्याचे वेळावेळी समोर आले आहे़
जिल्ह्यात आरोग्य अधिकाºयांच्या कार्यालयांचा प्रश्न गंभीर असताना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या निवासस्थानांबाबत चर्चा सुरु झाली आहे़ ग्रामीण भागात निवास करणाºया वैद्यकीय अधिकाºयांना निवासांमध्ये वीज, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषद अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याची माहिती समोर आली आहे़ आगामी काही दिवसातच याची अंमलबजावणी सुरु होऊन आरोग्य यंत्रणेतील अडथळे दूर होतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे़ यासाठी लवकरच बैठका होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
तळोदा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी हे सध्या उपजिल्हा रुग्णालयातून कामकाज पहात आहेत़ अक्कलकुवा येथील आरोग्याधिकारी हे महिला बालविकास विभागाच्या पडक्या कार्यालयातून, शहादा येथील अधिकारी पालिकेच्या इमारतीतून कामकाज पहात आहेत़ नंदुरबार येथील अधिकारी पंचायत समितीत बसत असल्याचे सांगण्यात आले असले तरी तेथे अनंत अडचणी असल्याचे समोर आले आहे़ धडगाव आणि नवापुर येथेही स्वतंत्र कार्यालय नसल्याने वेळोवेळी अधिकाºयांना दुसºया ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत असल्याचे सांगण्यात आले आहे़
४तालुका वैद्यकीय अधिकाºयांच्या केबीनचा प्रश्न प्रलंबित असताना दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीचा प्रश्नही समोर आला होता़ ‘लोकमत’ने बोगस डॉक्टरांच्या कारवायांसंबधी वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांवर चर्चा सुरु झाल आहे़ यानुसार आरोग्याधिकारी यांनी ६० पैकी निम्म्यापेक्षा अधिक निवासस्थानांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिल्याची माहिती आहे़ त्यावर येत्या आठवड्यापासून कारवाई सुरु होऊन आगामी काही दिवसात वैद्यकीय अधिकाºयांना राहता येईल अशी व्यवस्था करण्याचे संकेत देण्यात आले आहेत़ यासाठी निधी पूर्तता व इतर गोष्टींवर चर्चा होणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे़