पुत्राच्या उमेदवारीच्या मागणीने तळोद्याचे आमदार झाले संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:09 IST2019-06-18T21:09:26+5:302019-06-18T21:09:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा-शहादा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांचे नाव ...

पुत्राच्या उमेदवारीच्या मागणीने तळोद्याचे आमदार झाले संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा-शहादा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे पुत्र पोलीस निरीक्षक राजेश पाडवी यांचे नाव त्याच मतदारसंघातून भाजपकडूनच इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आल्याने आमदार पाडवी संतप्त झाले आहेत़ भाजपविरोधी काम करणा:या कार्यकत्र्याचे हे कारस्थान असल्याचा ठपका त्यांनी याप्रकरणी लावला आह़े
पोलीस निरीक्षक व कलावती फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत याच फाउंडेशनचे पदाधिकारी व भाजपचे काही पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपतर्फे आगामी निवडणूकीत राजेश पाडवी यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी करणार असल्याचे जाहिर केल़े राजेश पाडवी हे सध्या मुंबई नोकरीस आहेत़ वास्तविक तळोदा-शहादा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व सध्या राजेश पाडवी यांचेच पिता उदेसिंग पाडवी करीत आहेत़ आगामी निवडणूकीसाठी देखील ते भाजपकडून इच्छुक उमेदवार असून तशी तयारी त्यांनी सुरु केली आह़े असे असताना कार्यकत्र्यानी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना पुढे करीत असल्याने पाडवी यांचा राजकीय कौटूंबिक वादाला ठिणगी पडली आह़े या संदर्भात कलावती फाउंडेशननेही उदेसिंग पाडवी यांच्याबद्दल कुठलाही अनादर अथवा त्यांच्याप्रती आकस असल्याचे जाहिर केले आह़े तथापि राजेश पाडवी हे तरुण असून तरुणांना संधी मिळावी यासाठी ही मागणी केल्याचे सांगितले आह़े त्यावर आमदार उदेसिंग पाडवी यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत अजून आपण निवडणूक लढवण्यास सक्षम असून म्हातारे झालेलो नाहीत़ घरात कुठलाही वाद नाही, किंवा राजकारणाचा विषय नाही़ असे असताना काही कार्यकर्ते ज्यांनी गेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधी काम केले होते, असे कार्यकर्ते हे कारस्थान करीत असून अशा कार्यकत्र्याना भाजपमधून निलंबित करण्याची मागणी आपण पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितल़े