तळोदा तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST2021-09-23T04:34:24+5:302021-09-23T04:34:24+5:30

मेळाव्याला माध्यमिक शिक्षक संघ नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे , जिल्हा सदस्य ए. बी. पाटील, सिध्दार्थ महिरे,ए. डी. सूर्यवंशी ...

Taloda taluka TDF executive announced | तळोदा तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

तळोदा तालुका टीडीएफची कार्यकारिणी जाहीर

मेळाव्याला माध्यमिक शिक्षक संघ नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे , जिल्हा सदस्य ए. बी. पाटील, सिध्दार्थ महिरे,ए. डी. सूर्यवंशी उपस्थित होते. एम. टी.पाटील यांनी निरिक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पी.एम. वानखेडे, कार्याध्यक्ष योगेश पवार, उपाध्यक्ष सुजाता साळवे व दर्यावसिंग राजपूत, सहकार्यवाह सुरेश जोहरी, कोषाध्यक्ष चेतन सूर्यवंशी, महिला आघाडी प्रमुख आशा पाडवी, तक्रार निवारण समिती प्रमुख रघुवीरसिंग कुवर, विद्या समिती प्रमुख मनोज जावरे, कार्याध्यक्ष मन्सुरी शेख शब्बीर मोहमंद, प्रसिद्धीप्रमुख विनोद पगार, तसेच शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) तालुका अध्यक्ष किशोर माळी, कार्याध्यक्ष सुशील सूर्यवंशी, उपाध्यक्ष निशांत मोरे व मिलिंद धोदरे, कार्यवाह मुकेश कर्णकार, सहकार्यवाह शेख फिरोज शेख अहमद व महिला आघाडी प्रमुख कल्पना महाजन, कोषाध्यक्ष मुरलीधर शिंपी, तक्रार निवारण प्रमुख संजय तनपुरे, प्रसिद्धीप्रमुख पद्यमेश माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यक्रमासाठी जी.बी. काटे, ए.एस. मगरे, अमरीश सूर्यवंशी व एस.एस. ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Taloda taluka TDF executive announced