तळोदा पंचायत समितीला मिळणार आता नवीन इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:31 IST2020-03-01T12:31:37+5:302020-03-01T12:31:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा येथील पंचायत समितीच्या बांधकाम इमारतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. ...

तळोदा पंचायत समितीला मिळणार आता नवीन इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तळोदा येथील पंचायत समितीच्या बांधकाम इमारतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहे. आता पंचायत समितीच्या प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तळोदा पंचायत समितीची इमारत ब्रिटीशकालीन आहे. ही इमारत छोटीशी असल्यामुळे पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक विभागांचे समायोजन होत नाही. त्यामुळे प्रशासन व कृषी खात्या व्यतिरिक्त इतर सर्वच विभाग विखुरलेले आहेत. ही कार्यालये पंचायत समितीच्या प्रिमाईसेसमध्ये असली तरी प्रशासनास देखरेख ठेवणे अडचणीचे ठरत असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरदेखील अंकुश राखता येत नाही. त्यामुळे काही कर्मचारी कार्यालयात सापडत नसल्याचा आरोप आहे. त्यातही कामासाठी येणाºया नागरिकांना कामे करतांना इकडे-तिकडे भटकावे लागत असते. विशेष म्हणजे पंचायत समितीच्या सभागृहाची दुरवस्था झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही. त्यामुळे पदाधिकाºयांनी जनतेसाठी ांधण्यात आलेल्या सभागृहात आपले बस्तान बसविले आहे. परिणामी जनतेला बाहेरच पटांगणात बसावे लागत असते. साहजिकच पंचायत समितीसाठी प्रशस्त मध्यवर्ती इमारत उभारावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. लोकप्रतिनिधींकडेदेखील इमारतीची मागणी केली जात होती. या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तळोदा पंचायत समितीच्या इमारत बांधकामावर कार्यवाही करण्यासाठी प्रशासनास नुकतेच पत्र पाठविले असून, यात म्हटले आहे की, पंचायत समितीचा ठराव, इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट, बांधकामाचे वर्ष, जागा मालकीचा तपशील, सातबारा उतारा, बांधकामाचा क्षेत्रफळ, बांधकामाचा खर्च, शासन मंजूर आराखडा, तसेच इमारतीचे ढोबळ अंदाजपत्रक आदी बाबींची पूर्तता करून तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे नमूद करण्यात आले आहे. साहजिकच पंचायत समितीच्या इमारतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लागणार असून, संबंधीत यंत्रणेने यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे. दरम्यान पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने पंचायत समितीच्या जागेचा सातबारा बदल करून मिळणेबाबत येथील उपविभागीय अधिकाºयांना पत्रे दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तळोद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी पंचायत समितीस गेल्या महिन्यात भेट दिली होती. त्या वेळी पदाधिकाºयांनी त्यांच्याकडे इमारतीचा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आमदार पाडवी यांनी जिल्हा विकास समितीच्या बैठकीत तळोदा पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न उपस्थित करून त्याबाबत समितीचे लक्ष वेधले होते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन संबंधीत अधिकाºयांना सूचना केली होती. साहजिकच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने तळोदा पंचायत समितीच्या प्रशासनाला या प्रकरणी पत्र पाठवून ताबडतोब संपूण माहितीसह प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संबंधित सर्व यंत्रणांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करण्याची मागणी आहे.