स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत तळोदा पालिका ६६ वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:34 IST2020-08-25T12:34:31+5:302020-08-25T12:34:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी व नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ...

Taloda Municipality 66th in clean survey competition | स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत तळोदा पालिका ६६ वी

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत तळोदा पालिका ६६ वी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी व नागरिकांना स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात तळोदा पालिका ६६ व्या क्रमांकावर आली आहे. त्यानिमित्त पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाचा या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यात जिल्ह्यातील तळोदा पालिका ६६ क्रमांकावर आली आहे. गेल्या काही वर्षांपासून तळोदा पालिकेने शहरात स्वच्छतेला मोठ्या प्रमाणात महत्व दिलेले दिसून येत आहे.
शहरातील नवीन वसाहतीत घंटा गाडी नियमित फिरविण्यापासून तर शहरातील विविध भागात नियमित स्वच्छचेची कामे करून घेण्यासाठी पालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन तत्पर असल्याचे चित्र आहे. त्याचीच परिणीती म्हणून तळोदा पालिकेत यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात ६६ क्रमाकांची पालिका ठरली असल्याचे सांगितले जात आहे.
२०१८ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात तळोदा पालिका ३०७ क्रमांकावर होती तर गेल्या वर्षी २०१९ मध्ये १८६ क्रमांक तळोदा पालिकेने पटकाविला होता. यावर्षी तळोदा पालिकेने ६६ व्या क्रमांकावर झेप घेत पहिल्या १०० मध्ये स्थान पटकावले आहे.
पुढील काळात शहरात स्वच्छतेच्या बाबतीत मोठी कामे केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी सांगितले. जानेवारीपर्यत शहरातील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यन्वित करण्यात येणार आहे. तसेच पालिकेने स्वत:च्या मालकीचे गटारींची स्वच्छता करण्याचे मशीन खरेदी केले असून, यामुळे गटारींचा स्वच्छतेचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय पालिकेकडे व्हॅक्युम क्लीनर मशीनदेखील असल्याची माहिती त्यांनी दिली.
पालिकेने ६६ क्रमांक पटकाविल्याबद्दल नगराध्यक्ष अजय परदेशी व मुख्याधिकारी सपना वसावा यांच्या हस्ते पालिकेच्या स्वच्छतेची धुरा समभाळणाºया कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. लेखापाल विशाल माळी, सचिन पाटील, तत्कालीन आरोग्य निरीक्षक दिगंबर माळी व राजेंद्र माळी, प्रभारी आरोग्य निरीक्षण अश्विन परदेशी व मुकादम सुरेंद्र वळवी, अजय गोजरे, फायर ब्रिगेड वाहनचालक कमलेश कलाल आदीसह सर्व कर्मचाºयांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी कर्मचाºयांनी स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Taloda Municipality 66th in clean survey competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.