तळोदा येथे पाच लाखांसाठी विवाहितेस मारहाण

By Admin | Updated: June 23, 2017 13:12 IST2017-06-23T13:12:44+5:302017-06-23T13:12:44+5:30

बेदम मारहाण करीत केला मानसिक छळ

Taloda assaulting five lakhs for marriage | तळोदा येथे पाच लाखांसाठी विवाहितेस मारहाण

तळोदा येथे पाच लाखांसाठी विवाहितेस मारहाण

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.23 : प्लॉट खरेदीसाठी माहेरून पाच लाख रूपये आणावेत तसेच दिरासोबत अनैतिक ठेवण्यास नकार दिला या कारणावरून विवाहितेस बेदम मारहाण करून शारिरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े 
देवयानी योगेश गांगुर्डे रा़ राजकुळे नगर तळोदा़ ह़मु़ अनंतनगर चोपडा यांना 19 जानेवारी 2013 ते 2 जून 2017 या काळात पती योगेश अरविंद गांगुर्डे, दीर आशुतोष अरविंद गांगुर्डे, सासू मिनाक्षी अरविंद गांगुर्डे, नणंद राजश्री भगवान उमाळे, नंदोई भगवान अजय उमाळे यांनी माहेरून प्लॉटसाठी पाच लाख आणावेत तसेच दीरासोबत शारिरिक संबध प्रस्थापित करावेत, या कारणासाठी वेळोवेळी मारहाण करून शारिरिक व मानसिक छळ केला़ शहादा व तळोदा येथील घरी मारहाण व मानसिक छळ होत असल्याने विवाहिता त्रस्त झाली होती़
 दरम्यान तळोदा येथे पती योगेश याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने देवयानी यांनी तळोदा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आह़े त्यानुसार तळोदा पोलीस ठाण्यात पती योगेश, दीर आशुतोष, सासू मिनाक्षी, नणंद राजश्री व नंदोई भगवान उमाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Taloda assaulting five lakhs for marriage