तलाठी व मंडळाधिकारी करणार पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:33 IST2019-10-31T12:33:15+5:302019-10-31T12:33:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ...

तलाठी व मंडळाधिकारी करणार पंचनामे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात वेळावेळी झालेल्या पावसात खराब झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले आहेत़ त्यानुसार गुरुवारपासून पंचनाम्यांना सुरुवात होणार आह़े
जिल्ह्यात 60 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यापेक्षा पाहणी करण्याचे आदेश तलाठी व मंडळाधिकारी यांना दिले होत़े परंतू झालेला पाऊस हा अवकाळी असल्याने राज्य शासनाने पंचनामे करण्याचे आदेश काढून तसे पत्र नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले आह़े यानुसार गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा आढावा घेत पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत़ या आदेशांमुळे शेतक:यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतक:यांना तात्काळ भरपाई मिळण्याची शक्यता आह़े
दरम्यान कोसळलेला पाऊस हा अवकाळी पाऊस असल्याने यात कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, भात आदी खरीप पिकांचे आणि फळ पिकांचे नुकसान झाले होत़े काढणी केलेले आणि शेतात उभे असलेल्या पिकांचे सारखेच नुकसान झाल्याने शेतक:यांनी भरपाई देण्याची मागणी केली होती़ राज्यातील इतर भागासोबत नंदुरबार जिल्ह्यातही नुकसानीची स्थिती ही गंभीर असल्याने शासनाने जिल्हा प्रशासनाला आदेश देत कारवाई करण्याचे सूचित केले होत़े
गुरुवारपासून होणा:या या पंचनाम्यात महसूल विभागासह कृषी विभागाचे कर्मचारीही सहभागी होणार असल्याची माहिती आह़े
सोमवारी सायंकाळपासून नंदुरबार व नवापुर तालुक्यात वादळीवा:यासह झालेल्या पावसामुळे घरांचे नुकसान होऊन पशुंची जिवितहानी झाली होती़ यातील घोगळगाव ता़ नंदुरबार येथे बैल ठार झाला होता़ तलाठींकडून पंचनामा पूर्ण झाल्याची माहिती असून बैलमालकाला भरपाई देण्याची कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े