‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारसह ग्रामीण भागात रब्बी पिकांवर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:44 IST2017-12-06T16:44:27+5:302017-12-06T16:44:35+5:30

‘ओखी’च्या तडाख्याने नंदुरबारसह ग्रामीण भागात रब्बी पिकांवर पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ओखी वादळाचा परिणाम जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून जाणवण्यास सुरूवात झाली़ यामुळे जिल्ह्यातील विविध भागात संततधार पाऊस होऊन शेतशिवार जलमय झाल़े पावसामुळे पेरणी झालेला गहू, फुलावर आलेला हरभरा आणि बोंडाबाहेर आलेला कापूस यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आह़े
आज सकाळी अक्कलकुवा, धडगाव, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा शहरांसह ग्रामीण भागात तुरळक पावसाचे थेंब कोसळत होत़े सकाळी 9 नंतर पावसाच्या मध्यम सरी बरसण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांची शहरी भागात नागरिकांची तर ग्रामीण भागातील शेतशिवारात शेतकरी आणि मजूरांची धावपळ उडाली़ हिवाळ्यात कोसळणा:या अतीशित सरींमुळे अनेकांना हुडहुडी भरली होती़ ओखी वादळामुळे जिल्ह्यात आगामी 36 तास पावसाची स्थिती कायम राहणार आह़े