‘तांडव’ वेबसीरिजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:39+5:302021-02-08T04:27:39+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अॅमेझॉन प्राइम’वर अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रसारित झाली ...

‘तांडव’ वेबसीरिजवर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘अॅमेझॉन प्राइम’वर अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘तांडव’ ही वेबसीरिज प्रसारित झाली आहे. या वेबसीरिजमध्ये कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी आक्षेपार्ह संवाद दाखवून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे व्यक्तिरेखा दाखवून त्यांचाही अवमान केलेला आहे. तसेच ‘जेएनयू’मधील देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्हैयाकुमार आणि तत्सम देशविरोधी घटकांच्या उदात्तीकरणाचाही प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या वेबसीरिजमध्ये पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधानांचीच हत्या करतो, असे दाखवले आहे. यातूनही काही वेगळा संदेश किंवा इशारा देण्याचा प्रयत्न आहे का, याचा तपास करायला हवा. ज्याप्रकारे चित्रपटांना सेन्सॉर करण्यासाठी ‘सेन्सॉर बोर्ड’ आहे त्या धर्तीवर कोणतेही नियंत्रण नसलेल्या अनिर्बंध वेबसीरिजवर अंकुश लावण्यासाठी, वेबसीरिजना ‘सेन्सॉर’ करणारी यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी. चित्रपट, नाटके, जाहिराती, वेबसीरिज आदींतून सातत्याने होत असलेला देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीचे सतीश बागुल, राहुल मराठे, धर्मप्रेमी आकाश गावित, व्यंकटेश शर्मा व अमोल ठाकरे आदींनी हे निवेदन दिले.