स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 22:04 IST2020-11-04T22:03:55+5:302020-11-04T22:04:08+5:30

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावे, ...

Take measures to prevent migration | स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करा

स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना करा

n  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :   जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावे, असे आवाहन   पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. 
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, सहायक जिल्हाधिकारी अविशांता पांडा, वसुमना पंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड.पाडवी म्हणाले, ग्रामीण भागात पाझर तलावाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. वन विभागाने वनाच्छादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जंगलातील उत्पादनाच्या माध्यमातून देखील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार मिळू शकेल. आयुर्वेदीक औषधाच्यादृष्टीने उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात यावी. आदिवासी बांधवांना जंगलाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी वनधन केंद्राची स्थापना करण्यात यावी. 
शेवटी बोलताना त्यांनी सांगितले की, दुर्गम भागासह जिल्ह्यात  कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात यावे. जिल्ह्यातील नागरीकांना त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात यावी आदेश त्यांनी दिले. 
दरम्यान पालकमंत्र्यांनी तळोदा तालुक्यातील  रापापूर, धडगाव तालुक्यातील उमराणी आणि रामपूर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून आढावा देण्यात आला. 
दुस-या लाटेबाबत चर्चा
 बैठकीत स्थलांतराची नोंद ग्रामपंचायत स्तरावरघेण्यात यावी यासंदर्भात आदेश देण्यात आले आहे. यातून माहितीत सुटसुटीतपणा येवून बाहेरगावी गेलेल्या मजूरांना मदत करत येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.  
 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेशही बैठकीत पालकमंत्री पाडवी यांनी दिले. 

Web Title: Take measures to prevent migration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.