Take five thousand chillers and pass the thieves | पाच हजाराची चिल्लर घेऊन चोरटे पसार

पाच हजाराची चिल्लर घेऊन चोरटे पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील हाटदरवाजा भागात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी पाच हजार रुपयांची चिल्लर लांबविली. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हाटदरवाजा भागात नवनीत ओमप्रकाश जैन यांचे किराणा दुकान आहे. चोरट्यांनी त्यांच्या यश ट्रेडर्स व सुरेश अ‍ॅण्ड कंपनी या किराणा दुकान फोडून चोरी केली. चोरट्यांच्या हाती रोख रक्कम फारशी लागली नाही. इतर किराणा मालाला देखील त्यांनी हात लावला नाही. परंतु मिळालेली पाच हजार १०० रुपयांची चिल्लर घेऊन चोरटे पसार झाले.
याबाबत नवनीत जैन यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार राजेद्र चव्हाण करीत आहे. दरम्यान, या दुकानापासून दोन पोलीस ठाणे व एक औट पोस्ट हाकेच्या अंतरावर असतांनाही ही घटना घडली.

Web Title: Take five thousand chillers and pass the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.