ओबीसी दर्जासाठी दर्जी समाजाने न्यायालयीन लढा उभारावा- गजेंद्र शिंपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:40+5:302021-09-03T04:31:40+5:30
या संदर्भात मध्यवर्ती संस्थेने व गुजरातच्या पदाधिकार्यांनी गुजरात राज्याला कोर्टात घेवून जाणे गरजेचे आहे. वीस वर्षापासून समाज ओबीसीसाठी तेथील ...

ओबीसी दर्जासाठी दर्जी समाजाने न्यायालयीन लढा उभारावा- गजेंद्र शिंपी
या संदर्भात मध्यवर्ती संस्थेने व गुजरातच्या पदाधिकार्यांनी गुजरात राज्याला कोर्टात घेवून जाणे गरजेचे आहे. वीस वर्षापासून समाज ओबीसीसाठी तेथील स्थानिक गुजरातचे पदाधिकारी लढत असून पण मात्र सरकार फक्त ऐकून घेते. निर्णय देत नाही. महाराष्ट्राने दर्जींना ओबीसीमध्ये सामावून घेतले तसेच गुजरातने देखील शिंपींना सामावून घ्यावे. अन्यथा कोर्टात न्याय मिळेल यासाठी मंचावर बसलेले सर्व मान्यवरांनी गांभीर्याने लक्ष देवून गुजरात येथील शिंपी समाजाला न्याय मिळावा, यासाठी न्यायालयीन लढा लढण्याची तयारी ठेवली पाहीजे. व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बाबा बागुल, माजी अध्यक्ष बापू निकुम, सचिव संजय खैरनार, विश्वस्त गोपालराव शिंपी, शांताराम साळवे, विजय बिरारी, अहमदाबादचे प्रमुख अशोक ईशी, महाराष्ट्र संघटक सुहास जगदाळे, महाराष्ट्र युवक अध्यक्ष प्रमोद शिंपी व सर्व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते.