पोहता येत असल्याने वाहून जाणारा युवक बचावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:36 IST2019-09-28T12:36:12+5:302019-09-28T12:36:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील खामगाव येथे पुलावरुन वाहणा:या पुराच्या पाण्यात पडल्यानंतर पोहता येत असल्याने युवक बचावल्याची घटना ...

पोहता येत असल्याने वाहून जाणारा युवक बचावला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील खामगाव येथे पुलावरुन वाहणा:या पुराच्या पाण्यात पडल्यानंतर पोहता येत असल्याने युवक बचावल्याची घटना शनिवारी सकाळी घडली़ शिवण नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही युवक पाण्यातून मार्ग काढत घराकडे जात असतानाही ही घटना घडली़
वीरचक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने शिवण नदी दुथडी भरुन वाहत आह़े शनिवारी सकाळी खामगाव ते नंदुरबार दरम्यान कठडे नसलेल्या फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती़ यावेळी खामगाव येथील रविंद्र पांडुरंग पाटील हा पुलावरुन कोणत्याही आधाराविनाच निघाला होता़ पुलावर अध्यार्पयत आल्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा आल्यानंतर त्याचा तोल जावून तो पाण्यात पडला़ पोहता येत असल्याने पुलाच्या दुस:या बाजूला पडल्यानंतर त्याने स्वत:ला सावरत कसाबसा नदीकाठ गाठला़
यावेळी गावाकडच्या काठावर उभ्या असलेल्या युवकांनी त्याचे चित्रीकरण ते व्हायरल केले होत़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत युवकांना नदी काठावरुन घराकडे पाठवल़े शिवण नदीच्या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना संतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े परंतू अनेक ठिकाणी कमी उंचीच्या फरशी पुलावरुन जीवघेणी वाहतूक करण्यात येत आह़े यातून युवकांकडून दंगामस्तीसारखे प्रकार होत असल्याने गंभीर घटना घडण्याची भिती व्यक्त होत आह़े