शिव्रे येथे दोघांवर तलवार हल्ला

By Admin | Updated: June 27, 2017 12:49 IST2017-06-27T12:49:50+5:302017-06-27T12:49:50+5:30

शिव्रे येथे दोघांवर तलवार आणि कु:हाडीच्या सहाय्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली़ रविवारी घडलेल्या घटनेतील दोघा जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़

Swere sword attack on both sides | शिव्रे येथे दोघांवर तलवार हल्ला

शिव्रे येथे दोघांवर तलवार हल्ला

ऑनलाईन लोकमत

तळोदा,दि.27 - तालुक्यातील शिव्रे येथे दोघांवर तलवार आणि कु:हाडीच्या सहाय्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली़ रविवारी घडलेल्या घटनेतील दोघा जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ 
शिव्रे येथे घराची पडवी बांधण्याच्या कारणावरून आत्माराम बहादुरसिंग राऊत यांचा विजेसिंग रामसिंग राऊत यांच्यासोबत वाद झाला होता़ या वादातून विजेसिंग राऊत, अजरुन विजेसिंग राऊत, शिवाजी विजेसिंग राऊत, कलीबाई रामसिंग पाडवी, कृष्णा अजरुन राऊत, तुलसी अजरुन राऊत, विकास अजरुन राऊत, अजय रामसिंग पाडवी, कयाबाई अजरुन राऊत सर्व रा़ शिव्रे यांनी आत्माराम राऊत यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर कु:हाड व तलवारने वार केला़ यावेळी त्यांचा बचाव करण्यासाठी आलेले राजेश रेवा राऊत यांच्यावरही वार करण्यात आल़े यात ते जखमी झाल़े
 

Web Title: Swere sword attack on both sides