दोन हजार शिक्षक व कर्मचा-यांनी दिले स्वॅब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:28 PM2020-11-21T12:28:17+5:302020-11-21T12:28:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आरोग्य विभागाकडून तालुक्यातील १०८ माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे स्वॅब तपासणी करण्याचे कामकाज सुरू असून यांतर्गत ...

Swabs given by two thousand teachers and staff | दोन हजार शिक्षक व कर्मचा-यांनी दिले स्वॅब

दोन हजार शिक्षक व कर्मचा-यांनी दिले स्वॅब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  आरोग्य विभागाकडून तालुक्यातील १०८ माध्यमिक शाळांच्या शिक्षकांचे स्वॅब तपासणी करण्याचे कामकाज सुरू असून यांतर्गत आतापर्यंत २ हजार ३२५ शिक्षक व कर्मचा-यांनी स्वॅब दिले आहेत. 
२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याने प्रशासनाने शिक्षकांना स्वॅब तपासून घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार नंदुरबार शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक एक येथे तपासणी सेंटर तयार करण्यात आले होते. यासोबतच के.डी.गावीत इंग्लिश स्कूल पथराई, पोतदार स्कूल येथे स्वॅब तपासणी केली होती. यातून आतापर्यंत २ हजार ३२५ जणांच्या तपासण्या पूर्ण करण्यात आल्या आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. जे.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनात या तपासण्या सुरू आहेत. शनिवारी शहरातील डीआर हायस्कूल व काणे गर्ल्स हायस्कूलच्या शिक्षक व कर्मचा-यांचे स्वॅब नमुने तपासण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: Swabs given by two thousand teachers and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.