नवापूरातील आठ जणांचे स्वॅब निगेटिव्ह, १४ दिवस मात्र क्वॉरंटाईन राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:23 IST2020-05-28T12:21:31+5:302020-05-28T12:23:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :शहरालगतच्या उच्छल येथील कोरोना पॉझिटीव्ह २४ वर्षिय महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या आठही जणांचा प्रथम स्वॅब ...

नवापूरातील आठ जणांचे स्वॅब निगेटिव्ह, १४ दिवस मात्र क्वॉरंटाईन राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :शहरालगतच्या उच्छल येथील कोरोना पॉझिटीव्ह २४ वर्षिय महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या आठही जणांचा प्रथम स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने नवापूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
नवापूर पासुन दोन किमीवरील उच्छलच्या हनुमानफळीतील २४ वर्षीय महिलेचा २३ मे रोजी कोरोना पॉझीटीव्हचा अहवाल आला होता. शहराच्या रेल्वेस्थानक समोरील वसाहतीला लागुन असलेल्या या भागातील त्या महिलेच्या संपर्कातील आठ जणांना स्थानिक प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचा स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्या सर्वांचा पहिल्या स्वॅबचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. हा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार असुन दुसरा स्वॅब घेतला जाईल असे वाळेकर यांनी सांगितले. त्या आठही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.