विसरवाडीत सुवर्ण प्राशन संस्कार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:33+5:302021-06-02T04:23:33+5:30
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता, येथील ग्रामपंचायत आवारात लहान बालकांमध्ये रोगप्रतिकारात्मक शक्ती निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम ...

विसरवाडीत सुवर्ण प्राशन संस्कार शिबिर
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची संभावना लक्षात घेता, येथील ग्रामपंचायत आवारात लहान बालकांमध्ये रोगप्रतिकारात्मक शक्ती निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, म्हणून शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सरपंच बकाराम गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजय अग्रवाल, रामसिंग राजपूत, मुकेश अग्रवाल, सुभाष अग्रवाल, संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
१६ वर्षे वयोगटांपर्यंतच्या बालकांना सुवर्ण प्राशन ड्रॉप देण्यात आले. या शिबिराचे आयोजन कटारिया आयुर्वेद क्लिनिक व विसरवाडी मित्रमंडळाद्वारे करण्यात आले. याप्रसंगी सरपंच बकाराम गावीत यानी मार्गदर्शन केले. डॉ.प्रमोद कटारिया यांनी सुवर्ण प्राशन ड्रॉपबद्दल व या काळात मुलांचे आरोग्य कसे टिकवून ठेवता येईल, याची माहिती दिली.
विसरवाडी व परिसरातील ६९० बालकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सुवर्ण प्राशन ड्रॉपचे दुसरे शिबिर येत्या २० जून रोजी घेण्यात येणार आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रस्मित कटारिया, महक अग्रवाल, सिद्धार्थ कटारिया, शुभम अग्रवाल, रोहन राजपूत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रामसिंग राजपूत यांनी केले.