पालिकेच्या कामावरील स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांनी उठविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:07+5:302021-06-01T04:23:07+5:30
नंदुरबार : मर्जीतल्या ठेकेदाराला काम दिल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी पाणी पुरवठ्याची कामे स्थगित ठेवण्याच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांनीच एका आदेशान्वये स्थगिती दिली ...

पालिकेच्या कामावरील स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांनी उठविली
नंदुरबार : मर्जीतल्या ठेकेदाराला काम दिल्याच्या तक्रारीच्या चौकशीसाठी पाणी पुरवठ्याची कामे स्थगित ठेवण्याच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांनीच एका आदेशान्वये स्थगिती दिली आहे. ३१ मे रोजी हे आदेश काढण्यात आले आहेत.
नंदुरबार पालिकेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या कामाची निविदा मर्जीतल्या ठेकेदाराला दिल्याची तक्रार गुलजार रतनसिंग गिरासे या ठेकेदाराने केली होती. त्याच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमून कामाला स्थगिती दिली होती.
परंतू पाणी पुरवठ्यासारखी महत्वाची कामे ही पावसाळ्यापूर्वी करणे अत्यावश्यक असल्याने कामाला दिलेली स्थगिती उठविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॅा.राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या आदेशान्वये स्पष्ट केले आहे.
असे असले तरी पालिकेने नेमण्यात आलेल्या चौकशी पथकास त्यांच्या मागणीनुसार प्रकरणाशी निगडीत संबंधीत सर्व कागदपत्रे पुरविण्यात यावी व चौकशीला सहकार्य करावे असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.