कर्तव्यात कुचराई करणारे दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:32 IST2017-08-25T13:32:41+5:302017-08-25T13:32:54+5:30

दौरा : पोलीस अधीक्षकांची कारवाई

Suspended two policemen in duty | कर्तव्यात कुचराई करणारे दोन पोलीस निलंबित

कर्तव्यात कुचराई करणारे दोन पोलीस निलंबित

ऑनलाईन लोकमत


नंदुरबार, दि. 25 -  जिल्ह्यात रूजू झालेले पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी गुरूवारी रात्री मार्गावर तयार केलेल्या कॅन्व्हाय पॉईंटला भेट दिली़ या दरम्यान त्यांना एके ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी आढळून न आल्याने त्यांना निलंबित केल़े यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आह़े 
पोलीस अधिक्षक पाटील यांनी गुरूवारी रात्री रनाळे ता़ नंदुरबार जवळील दोंडाईचा-नंदुरबार रस्त्यावर काठोबा पोलीस चौकीवर भेट दिली़ यावेळी याठिकाणी नियुक्त असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुकलाल भिल व पोलीस नाईक सुनिल अहिरे हे दोघेही आढळून आले नाहीत़ पोलीस अधिक्षकांना तात्काळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहकर यांच्यासोबत संपर्क करून दोघांनाही निलंबित केल़े 
पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी रात्री जिल्ह्यातील पोलीस दूरक्षेत्रांना भेटी दिल्या़ दरम्यान पोलीस अधिक्षक पाटील यांनी नंदुरबार पोलीस मुख्यालयाचे पोलीस कॉन्स्टेबल सांगळे यांना व त्यांच्या पथकातील कर्मचा:यांना उत्कृष्ट पद्धतीने वाहनांवर कॅमेरे बसूवून कारवाई केल्याबद्दल पाच हजारांचे बक्षीसही यावेळी जाहिर केल़े 

Web Title: Suspended two policemen in duty