जळगाव येथे कोरोना कक्षात दाखल संशयिताचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 13:13 IST2020-03-31T13:12:16+5:302020-03-31T13:13:28+5:30

अहवाल आल्यानंतर कारण होणार स्पष्ट

Suspected death in Corona cell at Jalgaon | जळगाव येथे कोरोना कक्षात दाखल संशयिताचा मृत्यू

जळगाव येथे कोरोना कक्षात दाखल संशयिताचा मृत्यू

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल 52 वर्षीय संशयिताचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. या संशयिताचा अहवाल येणे अद्याप बाकी असून तो आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
या संशयिताला सोमवारी संध्याकाळी 6 वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री 11 वाजता त्याचा मृत्यू झाला.
या रुग्णाच्या लाळेचे नमुने औरंगाबाद येथे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले आहे, त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. मात्र तत्पूर्वीच या सांशीयितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. 
या संशयिताचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

Web Title: Suspected death in Corona cell at Jalgaon