बामखेडा येथे 50 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 12:58 IST2019-11-13T12:57:56+5:302019-11-13T12:58:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह राज्यमार्गालगतच्या शेतात ...

बामखेडा येथे 50 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा तालुक्यातील बामखेडा येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 50 वर्षीय महिलेचा मृतदेह राज्यमार्गालगतच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े दुपारच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला़
कलाबाई दयाराम गवळे असे मयत महिलेचे नाव असून सोमवारी सकाळपासून त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या़ त्यांच्या कुटूंबियांसह ग्रामस्थांनी गावशिवारात त्यांचा शोध घेतला होता़ परंतू त्यात मिळून आल्या नव्हत्या़ मंगळवारी सकाळी शहादा-शिरपूर रस्त्यावरच्या एका शेतालगत 50 वर्षीय महिलेचा मृतदेह पडून असल्याचे काहींना दिसून आले होत़े त्यांनी गावात ही माहिती दिल्यानंतर सारंगखेडा पोलीस ठाण्यात कळवण्यात आल़े पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी पथकासह पाहणी करत माहिती घेतली़ दरम्यान मयत महिलेच्या कुटूूंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आह़े उशिरार्पयत गुन्हा नोंदण्याचे काम सुरु होत़े