शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी वळण रस्ता ठरतोय प्रवाशांसाठी जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी :  शहादा तालुक्यातील सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्डे चुकविण्याच्या नादात कापूस घेऊन जाणारे ट्रॅक्टर व ट्रॉली उलटून अपघात झाल्यानी घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघात वाढले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्ता होईल तेव्हा होईल निदान या मार्गावरील खड्डे तरी बुजवावेत, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.गेल्या तीन वर्षांपासून कोळदा-खेतिया रस्त्याचे रुंदीकरणाचे सुरू असलेले काम संथगतीने होत असल्याने सुसरी धरण वळण रस्त्यावर गेल्या तीन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना अतिशय त्रास सहन करावा लागतो. त्यातच शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास याच मार्गावर कापसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी ठेकेदार व लोकप्रतिनिधींविरूध्द संताप व्यक्त केला. रस्ता रुंदीकरणाचे काम संथगतीने होत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी सुरू आहेत. या मार्गावर जाताना अनेकांना अपघाताशी सामना करावा लागत आहे. शिंदखेडा तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉलीत कापूस भरुन खेतिया येथे विक्रीसाठी जात असताना सुसरी धरण वळण रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे  टाळण्याच्या प्रयत्नात  ट्रॅक्टर व ट्रॉलीचे चाक खड्ड्यात आल्याने तोल अचानक बाजूला पडल्याने ते उलटून अपघात झाला.

किमान खड्डे तरी बुजवा...गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कोळदा-खेतिया रस्त्याच्या रुंदीकरणाचे  काम सुरू आहे. काही रस्तादेखील तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र रस्ते विकास विभाग नाशिक यांच्याकडे हा रस्ता हस्तांतर केला त्या वर्षापासून काम सुरू केले. परंतु काही भागात रस्त्याची पूर्णतः ‘वाट’ लागली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता होईल तेव्हा होईल मात्र तोपर्यंत निदान रस्त्यावरील खड्डे तरी बुजवा, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

शेतमाल व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळसध्या शेतकरी कापूस विक्रीसाठी आपआपल्या वाहनात कापूस भरुन खेतिया येथे आणत आहेत. तसेच सातपुडा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीद्वारे उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु सुसरी धरण वळण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने जीव मुठीत घेऊन तेवढा रस्ता पार करावा लागत आहे. त्यातच वाहनांचा खड्ड्यात तोल गेल्यास वाहन उलटून अपघात होत आहेत. यात वाहन चालक व शेतकऱ्यांना दुखापती होत आहेत. खेतिया येथे कापूस विक्रीसाठी मोठी बाजारपेठ असल्याने शेतकरी तेथे कापूस विक्रीसाठी नेतात. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांना अपघात होऊन शेतमाल व वाहनांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.