शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या ४०९ गावांमध्येही सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 12:14 IST2019-05-06T12:14:03+5:302019-05-06T12:14:09+5:30

कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम : तीन लाख नागरिकांच्या तपासण्या

Surveys in 409 villages with zero leprosy | शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या ४०९ गावांमध्येही सर्वेक्षण

शून्य कुष्ठरुग्ण असलेल्या ४०९ गावांमध्येही सर्वेक्षण

नंदुरबार : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती कार्यक्रमानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कुष्ठरोगीच नसलेल्या ४०९ गावांमध्ये पुन्हा नव्याने शोधमोहिम राबवण्यात येणार आहे़ यातून रुग्ण समोर आल्यास तात्त्काळ उपाययोजना करण्यात येणार आहे़
२ आॅक्टोबर २०१८ ते २ आॅक्टोबर २०२० या दोन वर्षात हा कार्यक्रम राबवला जात असून नंदुरबार जिल्ह्यात याची सुरुवात करण्यात आली आहे़ जिल्हा कुष्ठरोग कार्यालयाकडून १ मे पासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे़ महिन्यामध्ये शून्य कुष्ठरुग्णअसलेल्या गावांच्या सर्वेक्षण सुरू आहे. त्यानुसार धडगाव तालुक्यातील ९८, अक्कलकुवा ५७, नंदुरबार ४३, नवापूर ७४, शहादा ७६ आणि तळोदा तालुक्यातील ६१ अशा ४०९ गावांमध्ये हे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे़ यांतर्गत ३ लाख १४ हजार ८७७ नागरिकांच्या तपासण्या पूर्ण करण्यात येणार आहेत़ या गावांमधील प्रत्येक व्यक्तीची शारीरिक तपासणी करण्यासाठी अधिपरिचारिका आणि मलेरिया विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत़ जिल्हास्तरावरुन पर्यवेक्षण सुरु असलेल्या या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील कुष्ठरोगींची स्थिती समोर येणार आहे़ यातून येत्या काळात कुष्ठरोग मुक्त जिल्हा घोषणेचेही फलीत शक्य होणार असल्याचा अंदाज आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे़ गेल्या चार वर्षात कुष्ठरोग विभागाकडून सातत्याने केलेल्या मोहिमांमुळे जिल्ह्यात कुष्ठरोगींची संख्या ही ३०० च्या आत आल्याने समाधानही व्यक्त होत आहे़ सर्वेक्षणात आढळून येणाºया संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून होणार असून संशयित रुग्णांना तात्काळ औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्हास्तरावरुन अवैैद्यकीय परिवेक्षक आय़आरख़ान हे काम पाहात आहेत़

Web Title: Surveys in 409 villages with zero leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.