नंदुरबारात स्थलांतरीतांच्या पाल्यांचे सव्रेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:20 IST2018-10-06T12:20:23+5:302018-10-06T12:20:31+5:30
उसतोड मजुर : शाळास्तरावर वसतिगृह सुरु करणे गरजेचे, शैक्षणिक नुकसानीमुळे चिंता

नंदुरबारात स्थलांतरीतांच्या पाल्यांचे सव्रेक्षण
नंदुरबार : सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत उसतोड तसेच इतर मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात येत आह़े 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान हे सव्रेक्षण होत आह़े तथापि या स्थलांतरीत बालकांसाठी शाळास्तरावर वसतिगृह उपलब्ध करुन देणे गरजेचे आह़े
सध्याच्या काळात उसतोड मजुर स्थलांतरीत होण्याची संख्या वाढत असत़े विविध ठेकेदारांकडून उसतोडीचे ठेके घेत गावोगावी उसतोड मजुर पुरविण्यात येत असतात़ त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील मोठय़ा संख्येने उसतोड कामगार इतर तालुक्यांमध्ये तसेच जिल्ह्याबाहेरही स्थलांतरीत होत असतात़ कुटुंबियदेखील सोबत असल्याने साहजिकच यात 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्यांच्या शैक्षणिक जीवनावर दुष्परिणाम होत असतो़ त्यामुळे सर्व शिक्षा अभियानांतर्गत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शाळाबाह्य तसेच स्थलांतरीत होत असलेल्या मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात येत असत़े त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर हे सव्रेक्षण करण्यात येत आह़े
ज्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुले स्थलांतरीत होत असतील तर अशा वेळी सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षकांकडून संबंधित पालकांचे उद्बोधन करण्यात येत असत़े तसेच ज्या ठिकाणी मजुर स्थलांतरीत होत आहे, अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे वसतिगृह उपलब्ध करुन देणे किंवा संबंधित पाल्यांची गावातील त्याच्या नातेवाईकांकडे सोय करण्यात येत असत़े
गेल्या वर्षी 2 हजार 200 विद्याथ्र्याचे सव्रेक्षण
गेल्या वर्षी सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सव्रेक्षणात 2 हजार 200 विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े अशी माहिती विभागाकडून देण्यात आली़ संबंधित मजुराच्या पाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्या-त्या शाळेकडून विद्याथ्र्यास शिक्षण हमी कार्ड देण्यात येत असत़े त्यामुळे स्थलांतरीत झालेला विद्यार्थी हा त्या ठिकाणच्या संबंधित शाळेत हे हमी कार्ड दाखवून तेथे प्रवेश घेऊ शकतो़ त्यामुळे स्थलांतरामुळे त्याचे होणारे शैक्षणिक नुकसानही थांबत असत़े
स्थलांतर थांबवणे गरजेचे
नंदुरबारात मोठय़ा संख्येने शेतकरी ऊस हे पिक मुख्यत्वे घेत असतात़ येथील साखर कारखाने तसेच खांडसरींमुळे उसाचे उत्पादन घेण्यास शेतक:यांना वाव आह़े तळोदा, शहादा, नंदुरबार हे तालुके प्रामुख्याने ऊस उत्पादकांचे मानले जात असतात़ त्यामुळे दरवर्षी 20 ते 30 हजार उसतोड मजुर परजिल्ह्यात तसेच जिल्ह्यांतर्गत स्थलांतरीत होत असतात़ त्यामुळे साहजिकच त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबियदेखील स्थलांतरीत होत असतात़ त्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी प्रत्येक शाळेतील एक शिक्षक बालरक्षक म्हणून काम बघत असतो़
याअंतर्गत स्थलांतरीतांच्या पाल्यांना शिक्षण हमी कार्ड देणे, पालकांचे उद्बोधन करुन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, त्याच प्रमाणे ज्या गावी स्थलांतर होणार आहे त्या संबंधित गावात तात्पुरत्या स्वरुपाचे वसतिगृह उपलब्ध करुन देणे आदी कामे करण्यात येत असतात़
स्थलांतरामुळे जिल्ह्यातील संबंधित विद्याथ्र्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असत़े त्यामुळे साहजिकच स्थलांतराला आवर घालण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आह़े