रांझणी परिसरात बालकांचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:14 IST2020-06-21T12:14:05+5:302020-06-21T12:14:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : लॉकडाऊनमुळे अंगणवाडीतील बालकांचे वजन घेण्यासह इतर बंद असलेली कामे आता सुरू झाली असून, कुपोषणाच्या ...

Survey of children in Ranjani area started | रांझणी परिसरात बालकांचे सर्वेक्षण सुरू

रांझणी परिसरात बालकांचे सर्वेक्षण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : लॉकडाऊनमुळे अंगणवाडीतील बालकांचे वजन घेण्यासह इतर बंद असलेली कामे आता सुरू झाली असून, कुपोषणाच्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागातर्फे बालकांच्या सर्वेक्षणाची मोहिम राबविली जात आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या अंगणवाड्यांमधील किलबिलाट सुरू झाली आहे.
हा समुदाय आरोग्य अधिकारींकडून शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि सॅम-मॅम बालकांची धडक शोध मोहिम यासारखी कामेही युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. जेणे करून कुपोषणाने डोकेवर काढू नये यासाठी सीएचओ विशेष मेहनत घेत आहेत.
दरम्यान, सुमदाय व आरोग्य अधिकारी सर्वच तरूण असल्याने त्यांच्यात आरोग्य सेवा बजावतांना तसेच ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना कमालीचा उत्साह दिसून येत असल्याचे चित्र आहे.

समुदाय आरोग्य अधिकारी हे पद प्रत्येक आरोग्य उपकेंद्राला एक या प्रमाणे कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरण्यात आले असले तरी या डॉक्टरांकडून कोरोनाच्या काळात नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवत कर्तव्य पार पाडत आहे. आपापले उपकेंद्र सांभाळत आपल्या उपकेंद्राच्या परिसरातील ग्रामस्थांनाही ते कोरोनाबाबत जनजागृती करीत आहे. तरी शासनाने त्यांच्या कामाची दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्व सामान्यांकडून होत आहे.

Web Title: Survey of children in Ranjani area started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.