हरित लवादाच्या आदेशाने पूररेषेतील 108 गावांचे सव्रेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:56 AM2019-04-18T11:56:35+5:302019-04-18T11:57:20+5:30

10 नदीनाले : लाल पट्टय़ातील गावांमध्ये होणार उपाययोजना

Survey of 108 villages in the suburbs by the order of green fines | हरित लवादाच्या आदेशाने पूररेषेतील 108 गावांचे सव्रेक्षण

हरित लवादाच्या आदेशाने पूररेषेतील 108 गावांचे सव्रेक्षण

Next

नंदुरबार : 2006 नंतर जिल्ह्यातून वाहणा:या नद्यांना महापूर आलेला नसला तरी वेळोवेळी निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना मोठय़ा संकटांना तोंड द्यावे लागत होत़े यातून राष्ट्रीय हरीत लवादाने नंदुरबार जिल्ह्यातील नदीकाठच्या 108 गावांचे सव्रेक्षण करण्याचे आदेश दिले होत़े गेल्या वर्षात काढलेल्या आदेशानंतर हे सव्रेक्षण पूर्ण झाले असून लवकरच त्याचा निष्कर्ष समोर येणार आह़े     
लवादाने काढलेल्या आदेशानंतर सर्व सहा तालुक्यातून वाहणा:या 10 नदी-नाल्यांच्या काठावरील गावांच्या सव्रेक्षणासाठी निधीही दिला होता़ यातून दोन स्वतंत्र निविदा काढल्या गेल्या होत्या़ यानुसार पाटबंधारे विभागाच्या धुळे येथील कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार नंदुरबार, शहादा उपविभागात हे सव्रेक्षण पूर्ण  झाल्याची माहिती आह़े नंदुरबार तालुक्यातील 26, शहादा 41, नवापूर 8, अक्कलकुवा 9 तर धडगाव तालुक्यातील 24 अशा 108 अशा लाल पट्टय़ातील गावांमध्ये हे सव्रेक्षण झाले आह़े त्याचा अहवाल शासनाला दिल्यानंतर लाल पट्टय़ातील गावांमध्ये उपाययोजनांचा आराखडा तयार करुन निधी देण्यात येणार असल्याची माहिती आह़े पावसाळ्यापूर्वी या कामांना सुरुवात झाल्यास यातील अनेक गावे ही पूररेषेत येऊनही सुरक्षित राहून चांगल्या दर्जाच्या दीर्घकाळ टिकणा:या उपाययोजना करणे शक्य होणार आह़े 
सव्रेक्षणाच्या दुस:या टप्प्यात अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदीच्या पाणलोट क्षेत्रात येणा:या मणिबेली, धनखेडी, चिमलखेडी, गमन, सिंदुरी, बामणी, मुखडी, डनेल, मांडवा, तर धडगाव तालुक्यातील पौला, पिंपळचौक, शेलगदा, अट्टी, केली, थुवाणी, चिंचखेडी, भरड, शिक्का, रोषमाळ खुर्द, डोमखेडी, निमगव्हाण, सुरुंग, शेलदा, जुनवणे, खर्डी, माळ, बिलगाव, साव:या दिगर, भूषा, वरवली, सादरी, उडद्या आणि भादल या गावांमध्ये सव्रेक्षण केल्याची माहिती आह़े हरित लवादाने निधी दिल्यानंतर सूचित केलेल्या अटी-निकषानुसार हा कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहिती आह़े जिल्ह्यात तापी नदी काठावर सावळदे, कोरीट, सुजालपूर, बोराळे, नाशिंदे, हाटमोहिदे, अमळथे, ओसर्ली, खापरखेडा, आराळे, कोपर्ली ता़ नंदुरबार, तर शहादा तालुक्यातील जावदे, तोरखेडा, दोंदवाडे, फेस, खैरवे, भडगाव, टेंभे, कामखेडा, सारंगखेडा, खरवड, कौठळ, बामखेडा, बिलाडी, ससदे, शेल्टी, पळासवाडे, नांदरखेडा प्रकाशा, नंदुरबार तालुक्यातून वाहणा:या चांदवा नाल्या काठावरील कोरीट, समशेरपूर, सावळदे, बोराळे, सुजालपूर व नाशिंदे, शिवण नदी काठावरील करणखेडा, सुंदर्दे, आष्टे, ओझर्टे, घोगळगाव, अंबापूर, अजेपूर, खामगाव, विरचक, बिलाडी, रंका नाल्याकाठचे कोठडे व धानोरा, सुकई नदी काठाला लागून असलेले उमर्दे खुर्द ही गावे पूररेषेत गणली जातात़ शहादा तालुक्यात गोमाई नदी काठावरील जावदे, जाम, ओझर्टे, धामलोदे, तिधारे, गोगापूर, जवखेडा, भागापूर, टुकी, कवळीथ, पाडळदा, आसुस, होळ, टेंभली, लोणखेडा, मलोणी, शहादा, कुकडेल, पिंगाणे, मनरद, लांबोळे, करजई, बुपकरी, डामरखेडा, नवापूर तालुक्यातील रंगावली नदी काठावर वडकळंबी, चौकी, रायपूर, मोरथुवा, विजापूर, नंदवन, बोकळझर ही गावे पूररेषेत गणली जातात़ या सर्व गावांमध्ये हे सव्रेक्षण पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्यात आले होत़े ही सर्व गावे लाल पट्टय़ातील असल्याने नदीकाठावरची धोकेदायक बांधकामे आणि इतर अतिक्रमित बांधकामे यांची माहिती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Survey of 108 villages in the suburbs by the order of green fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.