सुरत-पाचोरा बसला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 21:42 IST2020-11-17T21:42:23+5:302020-11-17T21:42:32+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात सुरत येथून पाचाेरा येथे जाणा-या बसला ...

सुरत-पाचोरा बसला अपघात
n लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात सुरत येथून पाचाेरा येथे जाणा-या बसला टँकरने धडक दिली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघात घडला त्यावेळी बसमध्ये ८६ प्रवासी होते.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आगाराची एमएच २० बीएल ३४३६ ही बस सोमवारी सकाळी सुरत येथून पाचोराकडे निघाली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता बस कोंडाईबारी घाटात आली. घाटातील पीर दर्ग्याजवळ दहिवेल कडून भरधाव वेगात येणा-या जीजे १२ झेड ३७३९ टँकरने बसला धडक दिली. चालक प्रवीण मधुकर राठोड रा. करगाव ता. चाळीसगाव यांनी एसटी बस अपघात वाचविण्याकरिता उजव्या बाजूला घेतली तरीही समोरील टँकर हा डाव्या बाजूस येऊन धडकला. चालकाच्या प्रसंगावधानाने तसेच बसवरील नियंत्रण न सुटल्याने मोठा अपघात टळला. रस्त्याच्याकडेला बस उलटण्याची शक्यता होती. तसेच मागून भरधाव वेगात वाहने सुरू असल्याने तिहेरी अपघाताची भिती होती. परंतू चालकाने नियंत्रण राखत बस रस्त्याच्या एका बाजूला आणून उभी केली. अपघातात बसचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बसमधील प्रवाशांना दुस-या पर्यायी बसने धुळ्याकडे रवाना करण्यात आले. बसमध्ये प्रवाशांची संख्या अधिक असल्याने टँकर समाेरुन आला असता, तर मोठा अपघात घडला असता, असे प्रत्यक्ष दर्शींचे म्हणणे आहे.