नवापूर सीमा तपासणी नाक्यावर सुरत-चोपडा बस रस्ता सोडून टेकडीवर चढवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:17+5:302021-03-06T04:30:17+5:30

शुक्रवारी सुरत चोपडा बस क्रमांक एमएच १४ - बीटी ३९०७ सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरतकडून नवापूरकडे येत असताना नवापूर ...

The Surat-Chopda bus left the road at the Navapur border check post and climbed the hill | नवापूर सीमा तपासणी नाक्यावर सुरत-चोपडा बस रस्ता सोडून टेकडीवर चढवली

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर सुरत-चोपडा बस रस्ता सोडून टेकडीवर चढवली

शुक्रवारी सुरत चोपडा बस क्रमांक एमएच १४ - बीटी ३९०७ सकाळी सहा वाजेच्या सुमारास सुरतकडून नवापूरकडे येत असताना नवापूर सीमा तपासणी नाक्यावर रस्त्यावरून न जाता बंद केलेल्या रस्त्यावरून बस टाकली. त्याठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. बाजूला टेकडीवरून मातीचा रस्ता तयार करण्यात आलेला होता. बस चालकाला बस निघून जाईल असे वाटल्याने त्याने टेकडीवर बस टाकल्याने बस खड्ड्यात अडकल्याने काही तासापर्यंत बस टेकडीवरच अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच सकाळी नवापूर पोलीस ठाण्यातील कर्मचारी नाक्यावर रवाना झाले. या वेळी बस मधील सर्व प्रवाश्यांना पर्यायी व्यवस्था करून रवाना करण्यात आले. नऊ वाजेच्या सुमारास जेसीबीच्या साह्याने बस बाहेर काढून मार्गस्थ करण्यात आली. यादरम्यान प्रवाश्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

नवापूर सीमा तपासणी नाक्यावर गुजरातकडून महाराष्ट्रात येण्यासाठी बारा बुथ तयार करण्यात आलेले आहे. तेथून बस मार्गस्थ करणे गरजेचे असताना टेकडीवरून बस मार्गस्थ करणे हे प्रवासाचा दृष्टिने धोकेदायक होते. चोपडा आगारातील सुरत-चोपडा बस चालकाने केलेली चूक प्रवाश्यांचा जीवावर बेतू शकली असती. परंतु सुदैवाने दुर्घटना झाली नाही.

परिवहन महामंडळाने बसचालकांना मार्गस्थ होण्यासाठी दिलेल्या रूटनुसारच बस मार्गस्थ करणे गरजेचे असताना काही बस चालक प्रवाश्यांचा जीव धोक्यात टाकत शॉर्टकट मार्ग अवलंबत असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: The Surat-Chopda bus left the road at the Navapur border check post and climbed the hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.