सुरत-भुसावळ व नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर कोरोनामुळे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:43+5:302021-04-20T04:31:43+5:30

नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे कमी झालेली प्रवासी संख्या लक्षात घेता सुरत-भुसावळ पॅसेंजर व नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर पुढील ...

Surat-Bhusawal and Nandurbar-Bhusawal passenger canceled due to corona | सुरत-भुसावळ व नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर कोरोनामुळे रद्द

सुरत-भुसावळ व नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर कोरोनामुळे रद्द

नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे कमी झालेली प्रवासी संख्या लक्षात घेता सुरत-भुसावळ पॅसेंजर व नंदुरबार-भुसावळ पॅसेंजर पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात दुसऱ्यांदा या गाड्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे खान्देशातील प्रवाशांची मोठी अडचण होणार आहे.

कोरोनामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील गाड्यांचा देखील त्यात समावेश आहे. खान्देशवासीयांसाठी महत्त्वाची व जीवनवाहिनीचा दर्जा मिळालेल्या सुरत-भुसावळ व भुसावळ-सुरत ही पॅसेंजर रेल्वेगाडी आता पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. याशिवाय नंदुरबार-भुसावळ ही पॅसेंजर देखील रद्द करण्यात आली आहे.

खान्देशातील अनेक कुटुंब रोजगारासाठी सुरत व परिसरात स्थायिक आहेत. त्यांच्यासाठी ही पॅसेंजर महत्त्वाची आहे. ती रद्द झाल्याने गैरसोय होणार आहे. कोरोना काळात सलग दुसऱ्यांदा ही पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

Web Title: Surat-Bhusawal and Nandurbar-Bhusawal passenger canceled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.