सुरळपाळ-अजिपाळची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:56 IST2020-11-18T12:56:30+5:302020-11-18T12:56:38+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे :  नवापूर तालुक्यातील सुरपाळ-अजिपाळ देवस्थानात दरवर्षी दिवाळीत यात्रा आयोजित करण्यात येते. परंतु कोविड १९ च्या ...

Suralpal-Ajipal yatra canceled | सुरळपाळ-अजिपाळची यात्रा रद्द

सुरळपाळ-अजिपाळची यात्रा रद्द

 लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टे :  नवापूर तालुक्यातील सुरपाळ-अजिपाळ देवस्थानात दरवर्षी दिवाळीत यात्रा आयोजित करण्यात येते. परंतु कोविड १९ च्या महामारीमुळे गाव व परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु शासनाच्या आदेशामुळे १६ नोव्हेंबरपासून कोविड १९ या महामारीमुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार देवस्थान सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने गावस्तरावर आमसरपाडा, खोलघर, हनुमंत पाडा, वांजळे येथील नियमानुसार मोजकेच लोकांची बैठक सरपंच अर्चना प्यारेलाल कोकणी, माजी सरपंच तुळशीराम जगताप, धर्मा चौरे, लालसिंग चौधरी पोलीस पाटील श्रीकांत चौरे, पोलीस पाटील काळ्या गवळी, हिरालाल जगताप, माजी सैनिक चिंतामण कांबडे, श्रावण जगताप, धरमदास चौरे, चिंताराम गवळी, चंदू चौधरी, राजू कांबडे, इंद्रसिंग चौरे, प्यारेलाल कोकणी, रूस्तम चौरे, डोंगऱ्या राऊत, हिरालाल कांबडे, ब्रिजलाल चौरे, राजेश सोनवणे, लक्ष्मण चौरे, मोतीलाल कांबडे, इत्यादी देवस्थान समितीने निर्णय घेवून शासनाने ठरवून दिलेल्या नियम पाळून आदिवासी परंपरेनुसार यंदा साध्या पध्दतीने निसर्ग देवाची पूजा करून महामारीतून संपूर्ण गाव, देश मुक्त होवून जीवजंतू, पशू-पक्षी,शेतशिवार,पोराबाळांचे 
शिक्षण,आरोग्य यात सुखी व्हावे अशी प्रार्थना करीत परिसरातील लोकांनी नवस फेडले. यावर्षी भाविकांची गर्दी होवू नये यासाठी काळजी घेण्यात आली.

Web Title: Suralpal-Ajipal yatra canceled