गोवर-रुबेलाच्या तीन लाख लसींचा जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:43 IST2018-11-14T11:43:51+5:302018-11-14T11:43:59+5:30
नंदुरबार : 9 ते 15 वर्षाच्या बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े 27 नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरुवात ...

गोवर-रुबेलाच्या तीन लाख लसींचा जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरवठा
नंदुरबार : 9 ते 15 वर्षाच्या बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े 27 नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरुवात होणार आह़े यासाठी दोन लाख 40 हजार लसींचा पुरवठा आरोग्य विभागाकडून करण्यात आला असून मोहिमेंतर्गत माता व बाल संगोपन अधिकारी व आरोग्य विभाग यांच्याकडून आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचा:यांना प्रशिक्षित करण्यात येत आह़े
नंदुरबार जिल्ह्यातील 2 हजार 52 जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमधील 5 लाख 16 हजार 714 विद्याथ्र्याना गोवर-रुबेलाची लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े यासाठी दीड महिन्यापासून जनजागृतीपर मोहिमा आणि मार्गदर्शन वर्गही शाळांमध्ये भरवण्यात येत आहेत़ ही तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून या विद्याथ्र्याच्या सोयीसाठी विभागाने मागणी केलेल्या 5 लाख 76 हजार लसींपैकी 2 लाख 40 हजार लसींचा पुरवठा आरोग्य विभागाकडे करण्यात आला आह़े आरोग्य विभागाकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसचा साठा करण्यासाठी योग्य सोयी-सुविधा नसल्याने येत्या दोन दिवसात ह्या लसी जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्र, 290 उपकेंद्र, 11 ग्रामीण रूग्णालयाकडे सोपवण्यात येणार आह़े मोहिम यशस्वीकरण्यासाठी 650 आरोग्य सेविका तसेच तेवढेच आरोग्य कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आह़े या मोहिमेकरिता शाळा सुरु झाल्यानंतर शिबिरांना सुरुवात करण्यात येणार आह़े
शाळांमध्ये दोन आठवडे सुरु असलेले लसीकरण मोहिम पूर्ण झाल्यानंतर 2 हजार 437 अंगणवाडय़ांमध्येही मोहिम सुरु करुन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े येत्या 27 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या या मोहिमेत दीड हजाराच्या जवळपास आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सहाय्यक आणि आरोग्य विभागातील वैद्यकीय पथके असे एकूण पाच हजार कर्मचा:यांचा समावेश राहणार आह़े
जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी एखाद्या लसीकरणात सहभागी होणार असल्याने या मोहिमेबाबत जनसामान्यात उत्सुकता आह़े