नवापुरात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:27+5:302021-04-06T04:29:27+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील २७ वर्षीय तक्रारदार यांच्या मामाचे रेशन दुकान असून, तक्रारदार हे शासकीय कामात ...

Supply inspector in Navapur in ACB's net | नवापुरात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

नवापुरात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील २७ वर्षीय तक्रारदार यांच्या मामाचे रेशन दुकान असून, तक्रारदार हे शासकीय कामात त्यांना मदत करतात. सध्या शासनाने रेशन दुकानातील खातेदार यांचे रेशनकार्ड आधार कार्डाशी जोडण्याबाबत बंधनकारक केले असल्याने या कामासाठी तक्रारदार हे तहसील कार्यालय, नवापूर येथे आरोपी लोकसेवक याच्याकडे गेले असता, त्यांनी तक्रारदाराकडे रेशन कार्ड आधारकार्डशी जोडण्यासाठी एका रेशन दुकानाचे एक हजार याप्रमाणे दोन्ही दुकानाचे दोन हजार व चार महिन्यांचे एकूण आठ हजार रुपये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अप्रमाणिकपणे पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट व बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून पंच व साक्षीदार यांच्यासमक्ष लाचेची मागणी २८ जानेवारी रोजी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करून आरोपी लोकसेवक यास नवापूर येथून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव, जयपाल अहिररराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, दीपक चित्ते, मनोज अहिरे, संदीप नावडेकर, अमोल मराठे, चालक मनोहर बोरसे यांनी केली.

Web Title: Supply inspector in Navapur in ACB's net

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.