पोलीस अधीक्षक डहाळे यांची पुण्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 12:21 IST2017-08-20T12:21:19+5:302017-08-20T12:21:24+5:30

 Superintendent of Police Dahale changed Pune | पोलीस अधीक्षक डहाळे यांची पुण्याला बदली

पोलीस अधीक्षक डहाळे यांची पुण्याला बदली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांची पुणे येथे सीआयडीच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पुणे येथीलच उपायुक्त संजय पाटील यांची बदली करण्यात आली आहे. 
राजेंद्र डहाळे यांची सव्वा वर्षापूर्वी नंदुरबार येथे बदली झाली होती. काळात त्यांनी अनेक पोलीस विभागाला शिस्त लावली होती. शहादा, नंदुरबारची दंगल त्यांनी वेळेत आटोक्यात आणली होती. गेल्याच आठवडय़ात त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक देखील जाहीर झाले आहे. त्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केला होता. डहाळे यांच्या जागी पुणे येथे उपायुक्तपदी असलेले संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डहाळे हे सोमवारी पदभार सोडणार असून मंगळवारी पाटील हे पदभार स्विकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title:  Superintendent of Police Dahale changed Pune