अंधश्रद्धेच्या नादापाई पतीनेच केला पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:11 IST2019-11-17T12:11:46+5:302019-11-17T12:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अंधश्रद्धतेून होणा:या अघोरी प्रकाराला विरोध केल्याने बामखेडा येथे पतीनेच प}ीचा गळा आवळून खून केल्याचे ...

अंधश्रद्धेच्या नादापाई पतीनेच केला पत्नीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : अंधश्रद्धतेून होणा:या अघोरी प्रकाराला विरोध केल्याने बामखेडा येथे पतीनेच प}ीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. गुराख्याच्या प्रसंगावधानेने अखेर खुनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली. फिर्यादी पतीच आरोपी निघाला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
दयाराम पिरा गवळे व साथीदार दासभाऊ उर्फ दाजी बिजू ठाकरे अशी संशयीतांची नावे आहेत. शहादा तालुक्यातील बामखेडा शिवारात कलाबाई दयाराम गवळे या 52 वर्षीय महिलेचा सहा दिवसांपूर्वी गावालगत शेतामध्ये भरदिवसा खून झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पती व कुटूंबाने घातपाताचा संशय व्यक्त केल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. या खुनाचा गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांना मोठे आव्हानात्मक काम होते. सारंगखेडा पोलीस, एलसीबी यांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांनी आपल्या कौशल्याने तपासाला गती दिली. गावात जावून त्यांनी खुनाची माहिती देणा:याला बक्षीस देण्याचेही जाहीर केले. सहायक पोलीस निरिक्षक सरोदे हेही मागावर होते. गवळे यांच्या कौटूंबिक बाबींची सर्व माहिती त्यांनी घेतली. त्यातून अपेक्षीत धागेदोरे काही मिळाले नाहीत. अशातच गावातील गुराखी युवकाने पोलीस पाटील डॉ.योगेश चौधरी यांना भेटून घाबरतच या खुनाबाबतची माहिती दिली. चार दिवसांपासून ूमारेकरी आणि पोलिसांचा धाक यामुळे हा युवक काहीही बोलत नव्हता. अखेर त्याला चौधरी यांनी बोलते केले असता खुनाच्या घटनेचा उलगडा झाला.
शेतात शेळ्या चारत असतांना गुराखी युवकास लगतच्या गवताच्या आड काहीतरी हालचाल दिसली. त्याने तेथे जावून पाहिले असता कलाबाई यांचे पते दयाराम हे मांत्रिकाच्या सहाय्याने त्यांच्या गळ्यात ताईत बांधण्याचा प्रय} करत होते. त्याला कलाबाई विरोध करीत होत्या. गुराख्याने ही बाब पाहिल्याचे समजताच दयाराम गवळे व मांत्रिकाने त्याला दमबाजी करून तेथून जाण्यास सांगितले. नंतर त्या महिलेचा तेथे मृत्यदेह आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच दयाराम यांना विश्वासात घेवून माहिती घेतली असता त्यांनी गळ्यात बांधण्यात येणा:या ताईतानेच कलाबाई यांचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.
दरम्यान, संशयीत दयाराम पिरा गवळ व दासभाऊ उर्फ दाजी बिजू ठाकरे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
अंधश्रद्धेचा बळी.. कलाबाई यांचा अंधश्रद्धेतून बळी गेल्याचे उघड झाले आहे. ताईत कशासाठी बांधला जात होता. जंगलात त्यासाठी का नेले होते. मांत्रिक कोण होता. थेट खून करण्यार्पयत का ही बाब गेली असे एक ना अनेक प्रश्न कायम आहेत. त्याचा उलगडा आता होणार आहे. गुराखी युवकाने धैर्य दाखवत ही माहिती पोलीस पाटलांना दिल्यामुळे ही घटना उघड झाली. त्यासाठी पोलीस उपअधीक्षक पुंडलीक सपकाळे यांचेही कौशल्य त्यासाठी कामी आले. पती दयाराम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.