सनीसह साथीदारांनी चोरल्या ११ दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 12:21 IST2020-12-14T12:21:38+5:302020-12-14T12:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. त्यांच्याकडून ११ दुचाकी ...

सनीसह साथीदारांनी चोरल्या ११ दुचाकी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात एलसीबीला यश आले आहे. त्यांच्याकडून ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरीचा मुख्य सूत्रधार सनी चरणसींग पाडवी असून त्याचे इतर तीन साथीदार आहेत.
शहादा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू होते. त्यामुळे एलसीबीने या भागात लक्ष केंद्रीत केले. दहा दिवस पथकाने वेगवेगळ्या गावात जाऊन माहिती घेतली. त्यानुसार आमोदा, ता.शहादा येथील सनी चरणसींग पाडवी हा गवसला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने घराच्या मागे लपविलेली एक दुचाकी काढून दिली. तसेच साथीदार पवन रंजीत वसावे रा.आमोदा व हेमंत संतोष बागले, गणेश रवींद्र राजपूत, रा.मडकानी व योगेश परदेशी रा.म्हसावद यांची नावे सांगितले. तिघांना ताब्यात घेतले असून परदेशी फरार आहे. त्यांच्याकडून ११ दुचकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई एलसीबीचे निरिक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह दिपक गोरे, सजन वाघ, प्रमोद सोनवणे, विनोद जाधव, विकास अजगे, किरण पावरा, विजय धिवरे, सतिष घुले यांच्या पथकाने केली. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.