राज्यातील दीड कोटी कुटूंबांना मिळणार लाभ जनतेचा फायदा होईल.. संडे स्पेशल मुलाखत -जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:39 IST2019-11-17T14:38:47+5:302019-11-17T14:39:50+5:30
राज्यातील दीड कोटी कुटूंबांना मिळणार लाभ जनतेचा फायदा होईल.. प्रत्येक मिळकतीचा मालकी हक्काचा अभिलेख, मालमत्ता पत्रक ड्रोनद्वारे सव्र्हेक्षणातून उपलब्ध होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीला कर अकारणी, बांधकाम परवाणगी, अतिक्रमण निमरुलन यासाठी मदत होईल. कारण प्रत्येक मिळकतीचे नकाशे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे महसूल देखील वाढणार आहे. ग्रामपंचायतीकडे मालमत्ताकर निर्धारण पत्र (नमुना आठ ) नोंद वही स्वयंचलनाने तयार होऊन व्यवहार पारदर्शी व सुलभ करण्यास मदत होईल. ग्रामिण जनतेला घरासाठी बँकेचे कजर्ही मिळू शकेल.

राज्यातील दीड कोटी कुटूंबांना मिळणार लाभ जनतेचा फायदा होईल.. संडे स्पेशल मुलाखत -जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम
रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्षानुवर्षापासून भूमापन न झालेल्या गावठाण जागांचे ड्रोनद्वारे सव्र्हेक्षण करण्याचा प्रयोग सर्वप्रथम महाराष्ट्राने हाती घेतला आहे. आतार्पयत जवळपास तीन हजार गावांचे सव्र्हेक्षण पुर्ण होत आले असून येत्या तीन वर्षात राज्यातील हे काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे जवळपास दीड कोटी कुटूंबांना अर्थात साडेसात कोटी जनतेला त्याचा फायदा होणार असून त्यांना आपल्या मालकीच्या जागेचा सीटीसव्र्हे नंबर व नकाशा मिळणार असल्याचे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले.
प्रश्न : ड्रोनद्वारे सव्र्हेक्षणाची कल्पना आली कुठून?
उत्तर : पारंपारिक भुमापन पद्धतीत मोठय़ा प्रमाणावर विलंब येतो. तसेच अनेक तांत्रिक त्रुटय़ाही असतात. त्यामुळे आधुनिकतेचा युगात जापान असे काही ड्रोन तयार केल्याची माहिती मिळाली. त्याचा अभ्यासाअंती राज्य शासनाने हा निर्णय घेतला. ग्रामविकास विभाग, जमाबंदी आयुक्त व भारतीय सव्र्हेक्षण विभागातर्फे हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाने गेल्या ऑगस्ट महिन्यातच मंजुरी दिली आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चार ड्रोन मागविण्यात आले आहे. त्याचे प्रयोग यशस्वी होत असल्याने कामाला गती दिली जात आहे. आतार्पयत तीन हजार गावांचे सव्र्हेक्षण झाले असून नवीन तीन हजार गावांचे सव्र्हेक्षणही होणार आहे. ड्रोनची संख्याही वाढविण्यात येत असून लवकरच पुन्हा चार ड्रोन उपलब्ध होणार आहेत.
प्रश्न : या सव्र्हेक्षणाचे नेमके काय फायदे?
उत्तर : आतार्पयत आतार्पयत ग्रामिण भागातील जागांना सीटीसव्र्हे क्रमांक प्राप्त होत नव्हता. त्यामुळे गावठाणातील मिळकतीचे सव्र्हेक्षण करून प्रतिमांचे भुसंदर्भीकरण व अॅथोरेक्टीफिकेशन केले जाईल. नकाशांमधील मिळकतींना ग्रामपंचायतींचे मिळकत रजिस्टर जोडले जाईल. त्यामुळे शासकीय मालमत्तांनाही सव्र्हेक्षण मिळेल. खुल्या जागा, नाल्यांचे क्षेत्र व सिमा निश्चित होऊन मिळकतीचा नकाशा तयार होईल. नागरिकांच्या हक्काचेही संरक्षण होईल.
टॉवर उभारणार
गावठाण सीटी सव्र्हे संदर्भात कायम स्वरूपी लोकांना तात्काळ माहिती मिळावी यासाठी पुढील टप्प्यात ऑटो यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महाराष्ट्रात 80 ठिकाणी मोबाईल टॉवरसारखे स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येईल. त्या ठिकाणी त्या त्या परिसरातील नोंदी स्वयंचलित पद्धतीने करण्याचे नियोजन आहे.