इंजिनिअरींग उत्तीर्ण मुलाच्या नोकरीसाठी 15 लाख आणावेत म्हणून सुनेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:34 IST2019-06-20T12:34:23+5:302019-06-20T12:34:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील माहेर आणि जळगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये आणावेत ...

इंजिनिअरींग उत्तीर्ण मुलाच्या नोकरीसाठी 15 लाख आणावेत म्हणून सुनेचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील माहेर आणि जळगाव येथील सासर असलेल्या विवाहितेचा पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आला़ जानेवारी 2016 पासून हा प्रकार सुरु होता़ छळाला कंटाळून विवाहितेने अखेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़
फिर्यादीनुसार शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा वसीम शेख हकीम खाटीक रा़ वीर सावरकर नगर, पिंप्राळा, जळगाव याच्यासोबत मध्ये झाला होता़ विवाहानंतर पती वसीमसह सासरे शेख हकीम शेचा हमी खाटीक, सासू नजमा खाटीक आणि नणंद नाजिमा यांनी किरकोळ कारणांवरुन छळ करण्यास सुरुवात केली होती़ दरम्यान विवाहितेने मुलीला जन्म दिला होता़ यावेळीही सासरच्यांनी ‘मुलगा हवा मुलगी नको’ असे बोलून हिणवत वेळोवेळी मानसिक त्रास दिला होता़ 2016 मध्ये पती वसीम याने इंजिनिअरींगची परीक्षा पास केल्यानंतर नोकरी लावण्यासाठी विवाहितेने नंदुरबार येथील माहेरुन 15 लाख रुपये आणावेत म्हणून मानसिक त्रास देत छळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ यातून माहेरी आलेल्या विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात पती, सासरे, सासू आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक येलवे करत आहेत़
हाटमोहिदे येथील विवाहितेचा छळ
नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदे येथील माहेर तर अंकलेश्वर (गुजरात) येथील सासर असलेल्या विवाहितेचा सासरच्यांनी दुकान वाढवण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी छळ केला़ मार्च 2017 ते मे 2019 दरम्यान हा प्रकार घडला़
याबाबत विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप युवराज झाल्टे, युवराज रुपचंद झाल्टे, पुष्पाबाई युवराज झाल्टे, जयश्री मुकेश पवार, दिपीका कैलास झाल्टे, दिपक युवराज झाल्टे, योगिता दिपक झाल्टे, प्रदीप युवराज झाल्टे सर्व रा़ राजपिपला रोड अंकलेश्वर जि़ भरुच यांच्याविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े