सुलतानपूर जि. प. शाळेत साहित्य वाटप व मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:44+5:302021-03-14T04:27:44+5:30

सुलतानपूर येथील जि. प. शाळा व अंगणवाड्यांना सरपंच आशाबाई मोहन आवासे, उपसरपंच वसंत कापडे, ग्रामसेवक राजेंद्र पाडवी यांच्या हस्ते ...

Sultanpur Dist. W. Distribution and guidance of school materials | सुलतानपूर जि. प. शाळेत साहित्य वाटप व मार्गदर्शन

सुलतानपूर जि. प. शाळेत साहित्य वाटप व मार्गदर्शन

सुलतानपूर येथील जि. प. शाळा व अंगणवाड्यांना सरपंच आशाबाई मोहन आवासे, उपसरपंच वसंत कापडे, ग्रामसेवक राजेंद्र पाडवी यांच्या हस्ते सॅनिटायझर मशीन, शरीरातील तापमान तपासणी मशीन देण्यात आले. तसेच जि. प. शाळेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोहन आवासे, डॉ. हर्षल पाटील, योगेश ठाकरे, पृथ्वीराज उखळदे, गंगाराम ठाकरे, प्रकाश पवार, पोलीस पाटील भरत शिंदे, डॉ. विनोद पाटील, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक दतात्रय अहिरे, रत्नकांत भोईटे, पवित्रा देवरे, भरत पाडवी, वसावे, मुसळदे, ठाकरे, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दूर व्हावी यासाठी क्षेत्र समन्वयक अतीक शेख यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रत्नकांत भोईटे यांनी केले.

Web Title: Sultanpur Dist. W. Distribution and guidance of school materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.