नोकरी नसल्याच्या नैराश्येतून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:47 IST2020-07-20T13:47:13+5:302020-07-20T13:47:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : नोकरी लागत नसल्याच्या नैराश्येत देऊर, ता.शहादा येथील एका २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास ...

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून युवकाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : नोकरी लागत नसल्याच्या नैराश्येत देऊर, ता.शहादा येथील एका २६ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली.
पोलीस सूत्रानुसार, देऊर, ता.शहादा येथील महेंद्र मधुकर पवार (२६) या युवकाने नोकरी लागत नाही म्हणून नैराश्यात आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना स्वयंपाक खोलीत लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रवीण मधुकर पवार यांनी घटनेची माहिती दिल्यावरुन सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार देवीदास नाईक हे करीत आहेत. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वडाळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजन दुगड यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. रात्री उशिरा देऊर येथे शोकाकूल वातावरणात महेंद्रवर अंत्यसंस्कार करण्यात आले.