काठी येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या
By Admin | Updated: June 9, 2017 15:25 IST2017-06-09T15:25:04+5:302017-06-09T15:25:04+5:30
काठी, ता.अक्कलकुवा येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.

काठी येथील युवकाची गळफास घेवून आत्महत्या
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि.9 : काठी, ता.अक्कलकुवा येथे तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 7 जून रोजी घडली. युवकाचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने हे कृत्य केल्याचे त्याच्या वडिलांनी दिलेल्या खबरीत म्हटले आहे.
काठीचा मेदिरपाडा येथील नारसिंग राम्या राऊत (18) याने 7 जून रोजी काठी गावाच्या शिवारातील पोवल्या वसावे यांच्या शेतात गळफास घेतला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत राम्या आटय़ा राऊत यांनी खबर दिली. त्यात त्यांनी मानसिक संतुलन बिघडल्याने नारसिंग राऊत याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या खबरीवरून मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.