त:हावद पुनर्वसन येथे एकाची गळफास घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:08 IST2019-07-24T12:08:04+5:302019-07-24T12:08:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊनही घोषित-अघोषित करण्यावरुन होत असलेल्या दिरंगाईमुळे जमीन मिळत नसल्याने त:हावद ...

त:हावद पुनर्वसन येथे एकाची गळफास घेत आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : सरदार सरोवर प्रकल्पात बाधित होऊनही घोषित-अघोषित करण्यावरुन होत असलेल्या दिरंगाईमुळे जमीन मिळत नसल्याने त:हावद येथील बाधिताने गळफास घेत आत्महत्या केली़ ही घटना रविवारी घडली होती़
त:हावद पुनर्वसन येथील रामला मुवा:या पावरा याने रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली होती़ रामला पावरा पिंपळचौक ता़ धडगाव येथील होता़ त्याचे त:हावद येथे पुनर्वसन करण्यात आले होत़े सरदार सरोवर प्रकल्पात विस्थापित झाल्यामुळे त्याचे वडील मुवा:या पावरा यांना घोषित केले आह़े रामला यानेही प्रशासनाकडे घोषित करण्याचा दावा केला आह़े त्याच्या दाव्यावर प्रशासनाने कारवाई न केल्याने वंचित रहावे लागल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे वडील मुवा:या पावरा यांनी केला आह़े याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े रामला याच्यावर त:हावद पुनर्वसन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत़
दरम्यान त:हावद पुनर्वसन येथील कानसिंग रुपा तडवी (30) याची प्रकृती खराब झाल्याने त्याला तळोदा येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला़ वसाहतीत दवाखाना नसल्याने बाधितांचे हाल होत आहेत़