इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने शहाद्यात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:13 IST2019-04-12T12:13:11+5:302019-04-12T12:13:40+5:30
बारावीचा विद्यार्थी : घटनेमुळे हळहळ

इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने शहाद्यात आत्महत्या
शहादा : शहरातील विजय नगरात 18 वर्षीय विद्याथ्र्याने गळफास घेत आत्महत्या केली़ बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
राज सुरेश शिंपी असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून बारावीचा इंग्रजीचा पेपर कठीण गेल्याने त्याने पंख्याला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची पोलीसात नोंद आह़े दुपारी घरात त्याने गळफास घेतल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्यास रुग्णालयात दाखल केले होत़े परंतू त्यास मृत घोषित करण्यात आल़े मयत राज शिंपी याने या वर्षी बारावीची परीक्षा दिली आहे. अतिशय शांत व हुशार विद्यार्थी असल्याचे सांगितले जात़े घटनास्थळी पोलिस कॉन्स्टेबल मनोज सरदार, पोलीस कॉन्स्टेबल शेख, हेड कॉन्स्टेबल फुलपगारे यांनी पंचनामा करून शहादा पोलिसात सुरेश शिंपी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बुवा करीत आह़े दरम्यान मृतदेहाचे बुधवारी रात्री म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल़े घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आह़े