बोकड मारल्याच्या वादातून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:55 IST2019-04-10T13:55:14+5:302019-04-10T13:55:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील आमली शिवारात बोकडाचे पिल्लू मारल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण करण्यात आली़ सोमवारी ...

बोकड मारल्याच्या वादातून एकास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील आमली शिवारात बोकडाचे पिल्लू मारल्याच्या वादातून एकास बेदम मारहाण करण्यात आली़ सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
सोमवारी सायंकाळी ठाण्याविहिर ते इच्छागव्हाण रस्त्यावर आमली शिवारात विश्वास पाडवी याच्या मोटारसायकलच्या धडकेत रमेश परश्या नाईक यांच्या मालकीचे बोकडाचा मृत्यू झाला होता़ यातून विश्वास पाडवी याने रमेश नाईक यांना नुकसान भरपाई म्हणून 1 हजार रुपये रोख दिले होत़े या कारणावरुन भाऊ जुगा पाडवी, जिगर जहागू पाडवी आणि जहागू पाडवी सर्व रा़ इच्छागव्हाण यांनी रमेश आणि त्यांचा भाऊ संतोष नाईक यांच्यासोबत वाद घातला होता़ यातून तिघांना दोघांना मारहाणीदरम्यान रमेश नाईक याच्या डोक्यावर सळईने वार करुन त्यास तिघा संशयितांनी गंभीर जखमी केल होत़े त्यास तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े
जखमीवर उपचार पूर्ण झाल्यानंतर संतोष नाईक याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन भाऊ पाडवी, जिगर पाडवी आणि जहागू पाडवी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार करत आहेत़