ऊसतोड मजुरीला कंटाळलेल्या युवकाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:07+5:302021-03-15T04:28:07+5:30
याबाबत वडाळी, ता. शहादा येथील अशोक रत्नपारखे यांच्या शेताच्या बांधावरील पळसाच्या झाडाला रुमालाच्या साहाय्याने गळफास लावल्याची घटना काल ...

ऊसतोड मजुरीला कंटाळलेल्या युवकाची गळफास लावून आत्महत्या
याबाबत वडाळी, ता. शहादा येथील अशोक रत्नपारखे यांच्या शेताच्या बांधावरील पळसाच्या झाडाला रुमालाच्या साहाय्याने गळफास लावल्याची घटना काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत सारंगखेडा पोलीस रणजित पहाडसिंग ठाकरे (रा. मोराणे, जि. धुळे) यांनी खबरीवरून आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. पिंपरखेड, ता. जि. धुळे येथील कालू उर्फ आनंदा सोनवणे हा आपल्या कुटुंबीयांसह ऊसतोडणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून वडाळी, ता. शहादा येथे आला होता. त्याचे गावाशेजारी राहुटी करून वास्तव्य होते. त्याला ऊसतोडणी कामाचा लहानपणापासून संताप होता. अनेक वेळा कुटुंबीयांबरोबर त्याचे यावरून खटके उडत. मात्उर उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते. त्यामुळे पोटाची खळगी कशी भरणार, असे मनोमन विचार करत सहकारी मित्रांच्या सल्ल्याने तो रागावर नियंत्रण करायचा. मात्र त्याच्या संयमाचा बांध फुटला व या ऊसतोड कामातून कायमची सुटका करून घेण्यासाठी तो पहाटेच कुटुंबीयांसोबत ऊसतोडणीसाठी शेतात गेला. आई-वडील व पत्नी कामात असताना शौचास जाऊन येतो, असे पत्नीला सांगून शेजारच्या शेतात गेला व त्या ठिकाणी त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी कालू परत आला नाही. म्हणून पत्नी त्याला शोधू लागली तेव्हा तो शेजारच्या शेतातील झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. पत्नीने सासू-सासऱ्यांना ही माहिती दिली. मुलाने गळफास घेतल्याने आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. याबाबत रणजित पहाडसिंग ठाकरे यांनी सारंगखेडा पोलीस स्टेशनला खबर देऊन घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, हवालदार विजय गावित, गणेश नाईक आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करत पंचनामा केला. शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. राजन दुग्गड यांनी वैद्यकीय तपासणी केली. घटनेचा पुढील तपास हवालदार प्रमोद वळवी करीत आहेत.