रोझवा पुनर्वसन येथे युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:40 IST2020-03-15T13:39:55+5:302020-03-15T13:40:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मार्च रोजी ...

रोझवा पुनर्वसन येथे युवतीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ मार्च रोजी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे राहणारी तुला मांग्या पावरा (१७) ही युवती १३ मार्च रोजी दुपारी बारा वाजता शेतातील बैलांना चारापाणी करण्यासाठी गेली होती. बैलांना चारा पाणी देऊन ती घरी आली नाही. शेतात असलेल्या नातेवाईकांच्या घरी थांबली असेल असे समजून कुटुंबांने शोध घेतला नाही. मात्र १४ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता एका शेताजवळ असलेल्या पाण्याचा नाल्यात युवती बाभळीच्या झाडाला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. उपसरपंच रमेश शेल्या पावरा यांनी तळोदा पोलीस ठाण्यात कळविले. याबाबत खारकीबाई मांग्या पावरा यांच्या खबरीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार प्रशांत राठोड करीत आहे.